Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये “झोम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदरमध्ये परिसरात “झॉम्बी ड्रग”चा शिरकाव झाल्याची चर्चा सुरू असून, सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 03:43 PM
मिरा-भाईंदरमध्ये “झॉम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदरमध्ये “झॉम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदरमध्ये “झॉम्बी ड्रग”चा शिरकाव
  • सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
  • “झॉम्बी ड्रग” संदर्भातील धक्कादायक प्रकरणे समोर
भाईंदर : बंगळुरू, बिहार आणि चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरातही तथाकथित “झॉम्बी ड्रग” संदर्भातील धक्कादायक प्रकरणे समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“झॉम्बी ड्रग” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घातक अमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तीचे वर्तन पूर्णपणे अनियंत्रित होत असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी या ड्रगच्या प्रभावाखाली असलेले लोक विचित्र हालचाली करताना, स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा

मिरा-भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या घटना दोन ठिकाणी घडल्या आहेत यामध्ये 90 फीट रोड भाईंदर पश्चिम आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला विशेषतः हे ड्रग सेवन केलेली व्यक्ती दिसून आली आहे अशा व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमांवर होत आहे व्हिडिओ वायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक वर्गाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः युवकांमध्ये या ड्रगचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.

स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि पोलिसांना तातडीने या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. “या ड्रगचा पुरवठा कुठून होत आहे, कोणत्या नेटवर्कद्वारे तो शहरात पोहोचत आहे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे अमली पदार्थ केवळ व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करत नाहीत, तर समाजात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण करू शकतात.

‘झोम्बी ड्रग्स’ म्हणजे काय?

झोंबी ड्रग्स’ घेतल्यावर व्यक्ती शुद्ध हरपते, तासन् तास एकाच जागी पुतळ्यासारखी उभी राहते किंवा हिंसक हालचाली करते. या ‘झोंबी ड्रग्स’च्या अतिसेवणामुळे शरीरावर तीव्र जखमा होतात आणि त्वचा कुजल्यासारखी दिसू लागते, म्हणून याला ‘झोंबी ड्रग’ म्हटले जाते. हे ड्रग थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनंतर मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस सतर्क झाले असून तपास सुरू आहे. संबंधित तरुण नक्की कोण आहे आणि त्याने कोणत्या अंमली पदार्थाचे सेवन केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. अलीकडेच पोलिसांनी कोट्यवधींचे एमडी (MD) ड्रग्ज जप्त केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Matheran leopard : माथेरान घाटात प्रवासादरम्यान बिबट्याचे दर्शन; टॅक्सी चालकाने व्हिडिओ शूट, वन विभाग सतर्क

Web Title: Mira bhayandar zombie drug entry public safety concern news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • india
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
2

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
3

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.