Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Mira Road News: जोधपूर स्वीटसमोरील वाहतूक पोलीस चौकी हटवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कारवाईवर मराठी एकीकरण समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेबाबत सवाल केले आहेत. ‘वाहतूक पोलीस चौकी रस्त्याला अडथळा ठरत होती की दुकानाला?’ असा थेट सवाल समितीचे गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2026 | 11:57 AM
वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Follow Us
Follow Us:
  • जोधपूर स्वीटसमोरील वाहतूक पोलीस चौकी हटवली
  • आमदार नरेंद्र मेहतांच्या भूमिकेवर मराठी एकीकरण समितीचे प्रश्नचिन्ह
  • ‘चौकी रस्त्याला अडथळा की दुकानाला?’
  • गोवर्धन देशमुख यांचा सवाल
विजय काते, मिरा-भाईंदर: मिरा रोड येथील जेपी चौक, विनय नगर परिसरातील हुतात्मा राजगुरू मार्गावर जोधपूर स्वीट दुकानासमोर असलेली वाहतूक पोलीस बिट चौकी हटवून ती तोडण्यात आल्याच्या घटनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेवर मराठी एकीकरण समितीने प्रश्न उपस्थित केले असून, ही चौकी खरोखरच वाहतुकीला अडथळा ठरत होती की संबंधित दुकानासमोर अडचण निर्माण करत होती, असा सवाल समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. (Mira Road News)

Vasai Virar News : पोलिस महापालिका आमनेसामने! इमारती-चौक्यांच्या भाड्यापोटी कोटींच्या कोटी उड्डाणे; हाणामारीचा वाद महासभेत

देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, आईस्क्रीमच्या गाड्या, हातगाड्या आणि अनधिकृत वाहन पार्किंगचा प्रश्न आहे. चौकाच्या चारही बाजूंना सुमारे आठ ते दहा फूट जागेत पार्किंग आणि फेरीवाल्यांचा व्याप असल्याचा दावा करत त्यांनी या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे केवळ एका ठिकाणची वाहतूक पोलीस चौकी हटवताना इतर अडथळ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विशिष्ट दुकानांसाठीच निर्णय घेतले जातात का?

शहरातील सार्वजनिक जागा, वाहतूक व्यवस्था आणि विकासकामांबाबत निर्णय घेताना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाते की काही विशिष्ट व्यक्ती आणि व्यावसायिकांच्या सोयीचा विचार केला जातो, असा मुद्दाही देशमुख यांनी उपस्थित केला. आमदार आणि मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात नेमके काय सुरू आहे, याची माहिती आहे का, असा सवाल करत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

दरम्यान, काही दुकानांसमोरील तसेच विकासकांच्या नव्या इमारतीलगतच्या रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेने नोटीस काढल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण आणि अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे निकष समान आहेत का, याची स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.

प्रशासनाची भूमिका काय?

वाहतूक पोलीस बिट चौकी हटविण्यामागील अधिकृत कारण काय होते, त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती का आणि परिसरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई होणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. मात्र, चौकी हटविण्याचे अधिकृत कारण, संबंधित विभागाची भूमिका आणि आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहे.

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

Web Title: Jodhpur sweets traffic police chowky removed marathi ekikaran samiti questions mla narendra mehta sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
2

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
3

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप
4

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.