Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप: म्हणाले, “स्वप्ना पाटकर यांचा मानसिक छळ…”

स्वप्ना पाटकर यांचा मानसिक छळ संजय राऊतांनी केला असल्याचा गंभीर आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2025 | 08:20 PM
खासदार नरेश म्हस्केंचा MP संजय राऊतांवर गंभीर आरोप: म्हणाले, "स्वप्ना पाटकर यांचा मानसिक छळ..."

खासदार नरेश म्हस्केंचा MP संजय राऊतांवर गंभीर आरोप: म्हणाले, "स्वप्ना पाटकर यांचा मानसिक छळ..."

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे :  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार  खासदार संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा  मानसिक छळ केला आहे, असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.  स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे. राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तक्रारीला ९ वर्ष आणि गुन्हा दाखल होऊ तीन वर्षानंतरही राऊतवर पोलीसांनी कारवाई केली नसल्याने स्वप्ना पाटकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर आज खासदार म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली. म्हस्के म्हणाले की, राऊत विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. राऊत यांना कोण पाठिशी घालत आहे, राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही, दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का? स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची भूमिका काय असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. स्वप्ना पाटकरला न्याय मिळवून शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.

संजय राऊत हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशी जहरी टीका खासदार म्हस्के यांनी केली. पत्रकार परिषदेत म्हस्के पुढे असंही म्हणाले की, राऊत २४ तास केवळ राजकारण करतात. त्यांनी राज्यात एखादी बालवाडी देखील सुरु केली नाही. आता राऊत शरद पवारांवर टीका करत आहेत, हे दुर्देव आहे, अशी खोचक टीका केली आहे. शरद पवारांनी आतातरी राऊत सारख्या कपटी माणसाला दूर ठेवावा, असे खासदार म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यांची बांधिलकी हिंदूंशी नसून दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे, त्यांचा हिरवा चेहरा आज समोर आला, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

Web Title: Mp naresh mhaskes serious allegations against mp sanjay raut he said mental torture of swapna patkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
3

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.