Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं पुस्तक फाडणार का? थेट सवाल!

Sonia Gandhi Book Controversy : सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ पुस्तकातील सावरकरांच्या उल्लेखावरून शिंदेसेनेने केलेल्या निषेधाला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गोलवलकरांच्या ‘Bunch of Thoughts’ पुस्तकाचा दाखला देत शिंदेसेनेला थेट सवाल केला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 05:59 PM
sachin sawant on shivsena

sachin sawant on shivsena

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधींच्या पुस्तकावरून राजकीय वाद
  • सचिन सावंतांचा शिंदेसेनेला थेट सवाल
  • गोलवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तकाचा उल्लेख
 

मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तकाची पाने फाडून निषेध नोंदवला होता. आता काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी याच मुद्द्यावरून शिंदेसेनेला थेट सवाल केला आहे. (Sonia Gandhi Book Controversy)

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोलवलकर यांच्या ‘Bunch of Thoughts’ पुस्तकाचा उल्लेख केला. या पुस्तकात सावरकरांच्या विचारसरणीवर टीका करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

सावरकरांचा अपमान झाल्याचे सांगून सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडणारी शिंदेसेना गोलवलकरांचे पुस्तकही फाडणार का? तसेच संघाच्या विचारसरणीशी संबंधित पक्षासोबत सत्तेत राहणार की बाहेर पडणार, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

अरुण शौरींच्या पुस्तकाचाही दाखला

सावंत यांनी भाजपचे माजी नेते अरुण शौरी यांच्या ‘The New Icon – Savarkar and the Facts’ या पुस्तकाचाही उल्लेख केला. सावरकरांबाबत वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांनी केलेल्या लिखाणाकडे लक्ष वेधत त्यांनी शिंदेसेनेच्या निषेधाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या मते, एखाद्या पुस्तकातील विचारांना विरोध असेल तर त्याला उत्तर विचारांच्या माध्यमातून दिले पाहिजे. पुस्तक फाडणे हा योग्य मार्ग नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

माफीनाम्याच्या मुद्द्यावरूनही निशाणा

राहुल गांधी आणि सात्यकी सावरकर यांच्यातील पुणे न्यायालयातील खटल्याचाही सचिन सावंत यांनी संदर्भ दिला. ‘पुणे न्यायालयात राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर यांच्यातील सावरकर बदनामी खटल्यात, सावरकरांनी दहा वेळा माफीनामे दिले होते हे सात्यकी सावरकरांनी मान्य केले आहे. या साक्षित सात्यकी यांनी वीर उपाधीपासून माफीनामे, पेंशन, मुस्लीम लीग बरोबरच सरकार स्थापन करणे, गांधी हत्येच्या संदर्भातील संबंध यावरही भाष्य केलेले आहे,’ असेही सावंत म्हणाले.

सावरकरांच्या विचारांचा आणि वारशाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला शिंदेसेनेचा सोनिया गांधी यांच्या पुस्तकाला विरोध आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून संघ आणि भाजपच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या पुस्तक वादाचे राजकीय पडसाद आगामी काळातही उमटण्याची शक्यता आहे.

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सचिन सावंत यांनी शिंदेसेनेला कोणता सवाल केला?

    Ans: सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील सावरकरांच्या उल्लेखावरून पुस्तक फाडणारी शिंदेसेना गोलवलकरांचे ‘Bunch of Thoughts’ पुस्तकही फाडणार का, असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

  • Que: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे?

    Ans: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे नाव ‘Belonging: A Journey of Love’ असे आहे. त्यातील सावरकर आणि हिंदुत्वासंबंधीच्या उल्लेखांवरून शिंदेसेनेने निषेध नोंदवला आहे.

  • Que: सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात माफीनाम्याबाबत काय सांगितले?

    Ans: सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात सावरकरांनी ब्रिटिशांकडे दहा दयायाचिका दाखल केल्याचे मान्य केले. मात्र, त्या याचिकांची भाषा शरणागती किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा व्यक्त करणारी होती, असा अर्थ लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला.

Web Title: Sonia gandhi book controversy sachin sawant question shinde shivsena vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Congress
  • sachin sawant
  • shivsena
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी
1

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा
2

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
3

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
4

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.