Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

मुंब्रा–डायघर परिसरातील एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 05:07 PM
मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

Follow Us
Follow Us:
  • मुंब्रा-डायघर परिसरातील टायर गोदामाला भीषण आग
  • अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
  • टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
Thane Fire News Marathi : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा–डायघर (Mumbra – Dighar) परिसरात एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे मोठे लोट दूरवर दिसून येत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात येत आहे. गोदामात साठवलेल्या टायरमुळे आग अधिक वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. सध्या जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून अग्निशमन दलाकडून बचाव आणि नियंत्रणाचे काम सुरू आहे.

दरम्यान, परिसरात वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाल्यानंतर पंचनामा आणि पुढील चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर टायर्सचा साठा असल्याने आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. रबर जळत असल्याने आगीच्या ज्वाळा आणि आकाशात उसळलेले काळ्याकुट्ट धुराचे प्रचंड मोठे लोट कित्येक किलोमीटरवरून स्पष्ट दिसत होते. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या आगीत गोदामाचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून आग विझवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.

वाहतुक कोंडी

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तो शीळफाटा रस्ता अत्यंत वर्दळीचा आणि ठाणे-नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. नेहमीच अवजड आणि हलक्या वाहनांच्या गर्दीने गजबजलेला हा रस्ता असल्याने या आगीचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. अग्निशमन दलाचे बचावकार्य विनाअडथळा पार पडावे आणि आगीची झळ रस्त्यावरील वाहनांना बसू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद केली आहे. सध्या केवळ एकाच बाजूने (दुसऱ्या लेनवरून) वाहनांना संथ गतीने ये-जा करण्याची परवानगी दिली जात आहे. यामुळे शीळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Mumbra dighar tyre godown fire fire brigade on spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Fire News
  • thane

संबंधित बातम्या

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
1

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Philippines Ferry Tragedy : फेरीला भीषण आग; मृतांचा आकडा ७६ वर, १३ जण बेपत्ता
2

Philippines Ferry Tragedy : फेरीला भीषण आग; मृतांचा आकडा ७६ वर, १३ जण बेपत्ता

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
3

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
4

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.