Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण

नवी मुंबईच्या वाहतुकीला मोठी चालना देणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे ३२.६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 09, 2026 | 09:20 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण
  • सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूनक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
  • प्रकल्प 31 डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
नवी मुंबई, मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. एमएमआरडीएकडून व सिडकोकडून या प्रकल्पाची उभारणी होत आहे. या प्रकल्पाला तुर्भे ते खारघर असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात जुईनगर रेल्वे स्थानकाच्या समोरून रहेजा प्रकल्पाच्या बाजूने हा मार्ग सुरू होतो. या मार्गामुळे तुर्भे एमआयडीसी व तळोजा एमआयडीसी एकमेकांना थेट जोडले जाणार असल्याने औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. तर वेळेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन औद्योगिक क्षेत्राला गतिमानता लाभणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून, ३१ डिसेंबर २०२८ अशी डेडलाइन या प्रकल्पाची ठेवण्यात आली आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तुर्भे ते खारघर दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, तसेच तुर्भे एमआयडीसी आणि तळोजा हे दोन प्रमुख औद्योगिक भाग एकमेकांशी थेट जोडले जाणार असल्याने मालवाहतूक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

Mira Bhayandar News: ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील सायन-पनवेल महामार्गापासून सुरू होऊन हा मार्ग खारघर येथील गुरुद्वारा व सेंट्रल पार्क चौकापुढील ४० मीटर रुंदीच्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यामध्ये विलीन होतो.

एकूण लाबी: ५.९५७ किमी (यात १.७६३ किमी लांबीच्या भुयारी मार्गाचा समावेश आहे).

रस्त्याची क्षमताः ३+३ पदरी मुख्य मार्ग संकल्पित असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी ४ पदरी असे दोन एकदिशीय (One-way) टनेल तयार केले जात आहेत.

प्रकल्पाची सद्यस्थिती (३१ जुलै २०२६ पर्यंत)

टनेल-१ (टी-१) ब्रेकथ्रूः पहिल्या टनेलचे ब्रेकथ्रू (मिलाप) २९ जून २०२६ रोजी यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

टनेल-२ (टी-२) ब्रेकशूः दुसऱ्या टनेलचे ब्रेकथ्रू ऑगस्ट २०२६ अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.

उड्डाणपूल कामः तुर्भेच्या बाजूला ४ स्पॅनच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर

भौतिक प्रगतीः ३१ जुलै २०२६ पर्यंत प्रकल्याची एकूण भौतिक प्रगती ३२.६७% झाली आहे.

सर्व आवश्यक वैधानिक व संवैधानिक परवानग्या प्राप्त झाल्या असून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकल्प ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन शासनाने आखले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे?

    Ans: या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ५.९५७ किमी आहे.

  • Que: प्रकल्पामुळे कोणत्या भागांना फायदा होणार आहे?

    Ans: तुर्भे, खारघर, तळोजा आणि आसपासच्या भागातील नागरिकांना तसेच तुर्भे आणि तळोजा एमआयडीसीमधील वाहतुकीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल का?

    Ans: होय. हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Navi mumbai kharghar turbhe tunnel link road work 32 percent complete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Satara News: गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा
1

Satara News: गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा

Bike Taxi New Policy: आता झोमॅटो, झेप्टो अन् ॲमेझॉनवर सरकारची नजर! बाईक डिलिव्हरीसाठी लागू झाले नवे कडक नियम; काय बदलणार?
2

Bike Taxi New Policy: आता झोमॅटो, झेप्टो अन् ॲमेझॉनवर सरकारची नजर! बाईक डिलिव्हरीसाठी लागू झाले नवे कडक नियम; काय बदलणार?

मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर हटणार: बायोमायनिंग प्रकल्पासाठी 4.13 कोटींचा निधी मंजूर
3

मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर हटणार: बायोमायनिंग प्रकल्पासाठी 4.13 कोटींचा निधी मंजूर

Mira Bhayandar News: ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी
4

Mira Bhayandar News: ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.