Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News: सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कारण भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ आली आहेय. शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यावाचून करपू लागली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2026 | 11:59 AM
भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Follow Us
Follow Us:
  • विहिरी कोरड्याठाक, पिके उद्ध्वस्त अन् जनावरांसाठी चाराही नाही
  • चापडगावातील बळीराजा हवालदिल
  • जनावरांसह स्थलांतराची शेतकऱ्यांवर वेळ
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर: शेतकऱ्यांसाठी पाणी हा शेतीचा प्राण आणि कणा आहे, ज्याशिवाय पिकांची वाढ, उत्तम उत्पादन होत नाही. तर दुसरीकडे पावसाने दीर्घकाळ पाठ फिरवल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील चापडगाव गंभीर दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकरी आणि ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास पाणी आणि चाऱ्याच्या शोधात गाव सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली आहे.

विहिरी तळापर्यंत कोरड्या

पावसाअभावी चापडगावातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. गावातील अनेक विहिरी कोरड्याठाक पडल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला आणि ग्रामस्थांना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने उभी पिकेही वाचवता आलेली नाहीत.

मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध

‘1972 पेक्षाही गंभीर परिस्थिती’

स्थानिक शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना 1972 च्या भीषण दुष्काळाशी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 1972 मध्ये अन्नधान्याची मोठी टंचाई होती; मात्र काही विहिरींमध्ये पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते. यावेळी मात्र विहिरी तळापर्यंत कोरड्या पडल्याने पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

खरीप हंगाम उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दीर्घकाळ पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी केलेला मशागत, बियाणे, खते आणि इतर खर्च वाया गेल्याने आर्थिक संकट आणखी वाढले आहे. हातात पीक नसताना पुढील हंगामासाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

जनावरांच्या चारा-पाण्याचाही गंभीर प्रश्न

पिकांपाठोपाठ आता पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. पाणी उपलब्ध नसतानाच हिरवा आणि सुका चारा मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरांना जगवायचे कसे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही आणि पाणी-चाऱ्याची व्यवस्था झाली नाही, तर ज्या भागात पाणी आणि चारा उपलब्ध आहे तेथे जनावरांसह स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चापडगावातील हे वास्तव दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करत असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे.

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Web Title: Ahilyanagar chapadgaon severe drought water crisis farmers migration shevgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • maharashtra
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
1

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
2

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
3

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
4

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.