Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेत गर्भवती महिला महापालिका अधिकाऱ्याला बाळ गमवावे लागल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 03:12 PM
धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Follow Us
Follow Us:
  • कारवाईदरम्यान जमावाने धक्काबुक्की केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी प्रभावी हस्तक्षेप केला नसल्याचा महापालिकेचा दावा.
  • महिला अधिकाऱ्याच्या नुकसानभरपाईसह पोलिसांच्या भूमिकेवर हायकोर्टाने मागितला तपशील.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान संतप्त जमावाने केलेल्या धक्काबुक्कीमुळे महापालिकेच्या एका गर्भवती महिला अधिकाऱ्याला बाळ गमवावे लागल्याची माहिती मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारकडे पोलिसांची भूमिका आणि संबंधितांवरील कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितले. नवी मुंबईतील चार हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणी अॅड. किशोर शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी ३० जुलै रोजीच्या कारवाईची माहिती दिली.

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

१,४२१ बांधकामे सीसी-ओसीविना

एनएमएमसीच्या प्रतिज्ञापत्रानुसार १६ जून ते ६ ऑगस्टदरम्यान ६३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. शहरातील १,४२१ बांधकामे सीसी-ओसीविना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच नऊ लाखांहून अधिक मतदारांच्या एसआयआर प्रक्रियेमुळे ऑक्टोबरपर्यंत पाडकाम मोहीम राबवणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले.

पोलिसांकडून कारवाईत हलगर्जीपणाचा आरोप

पोलिस संरक्षणाची रीतसर मागणी करूनही पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप केला नाही, असा दावा त्यांनी केला. यासंदर्भातील व्हिडीओ आणि छायाचित्रेही न्यायालयात सादर करण्यात आली.

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम

पोलिसांकडे मागितला तपशील

या घटनेत गर्भवती महिला अधिकाऱ्याला बाळ गमवावे लागल्याचे समोर आल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पाडकामाच्या वेळी किती पोलिस कर्मचारी तैनात होते, किती जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि संबंधित महिलेला नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार, अशी विचारणा न्यायालयाने केली. “भरपाई मिळेल; पण तिच्या स्वप्नांचे, मनावर झालेल्या कायमस्वरूपी जखमांचे आणि कधीही भरून न येणाऱ्या दुःखाचे काय?” अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai municipal action pregnant woman officer miscarriage high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • High court
  • NAVARASHTRA
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
4

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.