Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: काम संथ, वाहतूक कोंडी प्रचंड! महामार्गाच्या अपूर्ण कामाचा वाशिमकरांना मनःस्ताप; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

Washim 161 Road Work Traffic Jam: राष्ट्रीय महामार्ग १६१ चे काम संथगतीने सुरू असल्याने वाशिममध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. ८९ कोटींचा निधी मंजूर होऊनही जोडरस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 09:39 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्ग १६१ चा खोळंबा कधी संपणार?
  • वाशिमकरांचा प्रशासनाला सवाल
  • वाशिमकर वाहतूक कोंडीने त्रस्त
वाशिम: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ च्या चौपदरीकरण आणि नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांसह वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या कामासाठी केंद्र शासनाने ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्यापही महामार्गाचे काही भाग आणि जोडरस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः हिंगोली नाका, पुसद नाका आणि अकोला नाका परिसरातील नागरिकांना या अपूर्ण कामांचा फटका बसत आहे. ( Washim News)

बुलढाण्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना; आमदार संजय गायकवाडांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

हिंगोली नाका ते अकोला रोडदरम्यानच्या महामार्गाचे  चौपदरीकरण

वाशिम शहरातील हिंगोली नाका ते अकोला रोडदरम्यानच्या सुमारे ५.११ ते ११ किलोमीटरच्या टप्प्यात महामार्गाचे चौपदरीकरण आणि नूतनीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल, वाहनधारकांचा प्रवास सुलभ होईल आणि अंतर्गत भागातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काम सुरू होऊन बराच कालावधी उलटला तरी काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या प्रकल्पाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली नाका आणि पुसद नाका परिसरात महामार्गाला जोडणाऱ्या शहरांतर्गत रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना महामार्गाचा वापर करण्याऐवजी पर्यायी मार्गाने शहरात ये-जा करावी लागत आहे.

अकोला नाका ते पुसद नाका या मार्गावर काम रखडले

विशेष म्हणजे अकोला नाका ते पुसद नाका या मार्गावर दोन रुग्णालयांच्या परिसरातील रस्त्याचे कामही रखडले आहे. या ठिकाणी संबंधित जागेचा प्रश्न निकाली न निघाल्याने रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. परिणामी, तयार करण्यात आलेल्या महामार्गाचा आणि जोडरस्त्यांचा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने तसेच विविध ठिकाणी जोडरस्ते अपूर्ण असल्याने शहरात वाहनांच्या रांगा लागत आहेत.

शहरी भागातून महामार्गावर जाण्यासाठी आणि महामार्गावरून शहरात येण्यासाठी तयार करण्यात येणारे जोडमार्ग पूर्ण झाले नसल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, व्यावसायिक आणि रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही काम पूर्ण होण्यास विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित केला.

शासनाकडून रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असताना त्याचा योग्य आणि वेळेत उप‌योग होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या मधोमध असलेले अडथळेही दूर झालेले नाहीत. येण्या-जाण्यासाठी तयार करण्यात आलेला जोडरस्ता अपूर्ण असल्याने नागरिकांना पुन्हा महामार्गाचाच वापर करावा लागत आहे. त्यामुळे या कामाकडे संबंधित विभागाने गांभीयनि लक्ष देऊन अडथळे दूर करावेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,प्रकल्प संचालक, राकेश जवादे म्हणाले की, वाशिमचे समाजसेवक, सुशील भीमजियानी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चे बहुतांश काम पूर्णत्वाकडे आले, मात्र, रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या २ रुग्णालयाशी संबंधित जागेचा न्यायालयीन वाद असल्यामुळे त्या ठिकाणचे काम थांबले आहे. हा न्यायालयीन प्रश्न निकाली निघाल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होऊ शकेल.

Ramayan Movie Controversy : रामायण सिनेमावरून राजकारण तापलं! काँग्रेसचा RSS, विश्व हिंदू परिषदेवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?

    Ans: वाशिम शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो.

  • Que: महामार्गाच्या कामासाठी किती निधी मंजूर झाला आहे?

    Ans: केंद्र शासनाने ऑगस्ट २०२५ मध्ये ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • Que: वाशिममध्ये कोणत्या भागांत वाहतूक कोंडी होत आहे?

    Ans: हिंगोली नाका, पुसद नाका आणि अकोला नाका परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: Washim national highway 161 four construction work delay traffic jam issue pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Traffic
  • traffic jam
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: पेनटाकळीत पाणीसाठा मुबलक, तरी वाशिमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम; शिवसेनेचा जलसंपदा विभागाला थेट इशारा
1

Washim: पेनटाकळीत पाणीसाठा मुबलक, तरी वाशिमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम; शिवसेनेचा जलसंपदा विभागाला थेट इशारा

Washim: वाशिमच्या मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! दावे-हरकतींच्या निपटाऱ्याला मुदतवाढ; जिल्हाधिकारी कुंभेजकरांची माहिती
2

Washim: वाशिमच्या मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! दावे-हरकतींच्या निपटाऱ्याला मुदतवाढ; जिल्हाधिकारी कुंभेजकरांची माहिती

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये
3

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण
4

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.