Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाेंबिवलीतील शिवम टॉवरच्या मालमत्ता कराची थकबाकी नेमकी कोणाची ? थकबाकीची रक्कम 16 लाखाहून अधिक

डोंबिवली पश्चिममधील शिवम टॉवर या इमारतीने 16 लाखाहून अधिक रक्कमेचा मालमत्ता कर थकविला आहे. याप्रकरणी इमारतीला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सोसायटीने ही थकबाकी भरण्यास नकार दिला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 14, 2024 | 10:17 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली-शहराच्या पश्चिम भागातील शिवम टॉवर या इमारतीने मालमत्ता कर थकविला आहे. या कराची थकबाकी १६ लाख ३३ हजार ४२९ रुपये आहे. ही रक्कम भरण्याची नोटिस इमारतीला बजावली आहे. पण ही थकबाकी भरण्यास इमारतीच्या सोसायटीने नकार दिला आहे. इमारतीचे रहिवासी आणि बिल्डर यांच्यात पार्किंगच्या वापरावरुन वाद आहे. त्यामुळे ही थकबाकी नेमकी कोणी भरायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मालमत्ता कर भरण्यास नकाराचे  कारण

या इमारतीचे सेक्रेटरी डा’. गोपालकृष्णा गच्छी यांनी सांगितले की, इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला २००७ साली प्राप्त झाला. त्यानंतर या इमारतीत रहिवासी वास्तव्याला आले. रहिवासियांनी इमारतीची सोसायटी २००९ साली नोंदणी केली. या इमारती सदनिकाधारकांकरीता पार्किंगची जागा दिली गेली होती. ही जागा बिल्डरने हस्तांतरीत केली नाही. या प्रकरणी रहिवासियांनी तक्रार केली होती. ही तक्रार २००९ सालापासून प्रलंबित आहे. महापालिका प्रशासनाकडून पार्किंगची जागा बिल्डरला वापरासाठी दिली गेली. तो त्याचा वाणिज्य वापर २०१४ -१५ सालापासून करीत आहे. त्याने पार्किंगचे प्रवेशद्वारे बंद करुन दुसरीकडून प्रवेश सुरु केला आहे. पार्किंगचा वापर रहिवासी करीत नसताना इमारतीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींना मालमत्ता कराच्या थकबाकीची १६ लाख ३३ हजार ४२९ रुपये भरण्याची नाेटिस बजावली आहे. वापर बिल्डर करीत असल्याने रहिवासियांनी हा मालमत्ता कर भरण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती.

CM Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; पुणे पुस्तक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणेकरांना आश्वासन

पार्किंगच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम

या प्रकरणी उपायुक्त देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता मालमत्ता कर वसूलीची नोटिस ही बिल्डरच्या नावे काढण्यात आली आहे. सोसायटीला या प्रकरणी केवळ सुनावणीकरीता उपस्थित राहण्याची नोटिस बजावली होती. या प्रकरणी सुनावणी झालेली आहे. सोसायटीच्या मते बिल्डरने पार्किंगच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. बेकायदेशीर बांधकामाची कारवाई हा विषय मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत नाही.

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला; दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळणार?

याप्रकरणी तात्काळ कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश

साेसायटीच्या तक्रारीनुसार बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी प्रभाग अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. तावडे यांनी म्हटले आहे की, शिवम टॉवरचे बिल्डर जोशी एंटर प्रायझेस यांनी पार्किंगचा जागेचा मार्ग बंद केला आहे. मंजूर विकास आरखड्या व्यतिरिक्त केलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी बिल्डरच्या विरोधात एमआरटीनुसार कारवाई करा असे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. पण आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. याप्रकरणी तात्काळ कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पुन्हा दिले आहेत.

Web Title: Property tax arrears of more than 16 lakhs for shivam tower in dombivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 10:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Property Tax

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.