मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; पुणे पुस्तक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणेकरांना आश्वासन
CM Devendra Fadnavis in Pune Book Festival : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रम म्हणून पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. पुणे पुस्तक महोत्सव हा इतका सुंदर आहे की, मला पुन्हा येईन, पुन्हा येईन असे वाटते. कारण या पुस्तक महोत्सवाने विश्वविक्रम केला आहे. येथे पूर्वी मी आलो होतो त्यावेळी फक्त पुस्तकाचे स्टॉल होते. परंतु, आता येथे अनेक स्टॉल आहेत. विशेष गोष्ट गोष्ट म्हणजे फूट स्टॉलसुद्धा आहेत, ज्याची मला भेट घालून दिली नाही, याबद्दल मी नाराज आहे, अशी मिश्कील टीपण्णीदेखील त्यांनी केली.
आपल्यावर मराठी भाषेची जबाबदारी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. पुणेकर ही जबाबदारी उत्तम तऱ्हेने पार पाडत आहेत, असे मला पुणे पुस्तक महोत्सवातून दिसून येत असल्याचे समजले. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आपली सभ्यता, संस्कृती फार जुनी आहे. आपल्यातील सृजनशीलता जिवंत ठेवायची असेल तर विचारांचा दर्जा वाढला पाहिजे, विचारांची मेजवाणी अशा पुस्तक संस्कृतीमधूनच मिळते. असेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्या ज्ञानात भर पडते परंतु ही भर टाकण्यासाठीसुद्धा सृजनशील माणसाची गरज लागते. ही सृजनशीलता विचारांनी येेते आणि हे विचार पुस्तकापासूनच येतात.
वाचन संस्कृती जिवंत राहण्यासाठी
नालंदा विद्यापीठ 3 महिने जळत होते. जगातल्या सगळ्या सभ्यता आपण सांगतो त्या संपल्या. भारतीय सभ्यता आपण जी सांगतो ती जुनी तर आहेच पण चिरकाल आहे, जी सातत्याने ही सभ्यता टीकून आहे. आपली सभ्यता कायम टीकून आहे. सृजनशीलता आपला विचार देते, आजच्या डिजिटल जगात आमच्या ग्रंथांचे काय होईल असे वाटते. त्यावेळी मला वाटते आमची सृजनशीलता ही कायम ग्रंथांचे संगोपन करीत राहणार याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुण्याचे पुस्तक महोत्सव होय. वाचन संस्कृती कधीच संपू शकत नाही. समाजात मूल्ये जिवंत ठेवायची असतील तर वाचन संस्कृती जिवंत ठेवली पाहिजे.