Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, अशी मागणी होत आहे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 17, 2025 | 03:19 PM
राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामध्ये सर्विस रोडचे सुद्धा विलीनीकरणाचे काम सुरू आहे. घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा अशी मागणी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राजन विचारे यांनी आज (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी व सेवा रस्ता विलीनीकरण याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पत्रामध्ये ठाणे शहराचे घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेले शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरी निमित्त आपली खाजगी वाहने घेऊन घरा बाहेर पडत असतात.अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहने सोडली जात आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर पट्ट्यातील नागरिक तसेच खाजगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत.

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही

खड्यामुळे होणारे अपघात व वाहतूक कोंडी संदर्भात नागरीक आंदोलन छेडत असून याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी हायवे पूर्व दुती महामार्गावरील दोन्ही बाजूस सेवा रस्ता सर्विस रोड विकसित केले होते. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होती त्यामध्ये चार ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्विस रोड महापालिकेला करता आला नाही.

शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल यांना धोका

सर्विस रोड रस्ता हायवे प्रवृत्ती महामार्गास विलीनीकरणाचा घाट ठाण्यातील काही मंडळी करत आहेत. जर हा सर्विस रोड हायवे पुर्वदुती महामार्गावर विलीनीकरण झाल्यास या रस्त्याच्या दोन्ही बाजूस ८ लाखाच्या वर लोकसंख्या असणाऱ्या वस्तीत सोसायटी, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, चर्च, मंदिरे, बाजारपेठ, यांना धोका निर्माण झाला आहे.पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स कशी जाणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

आश्वासनांचे काय झाले?

सद्यस्थिती या सेवा रस्ता विलीन करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मनेरा यांनी हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त यांना दि.२२/०१ /२०२५ व दि.१३/०३/२०२५ रोजी बैठक घेऊन नागरिकांना विश्वासात न घेता काम कसे सुरु झाले याचा जाब विचारण्यासाठी गेलो असताना एम एम आर डी ए व स्थानिक नागरिक यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करून देण्याचे आश्वासन केले होते परंतु हे आश्वासन खोटे ठरले अद्याप बैठक घेण्यात आली नाही.

Meenatai Thackeray statue : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग; शिवसैनिक आक्रमक, वातावरण तापणार?

Web Title: Rajan vichare on stop the work of merging the ghodbunder road service road immediately demands to the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • shivsena
  • thane

संबंधित बातम्या

Who is Meena Thackeray : कोण होत्या मीनाताई ठाकरे? शिवसैनिकांना त्यांनी दिली आईची माया
1

Who is Meena Thackeray : कोण होत्या मीनाताई ठाकरे? शिवसैनिकांना त्यांनी दिली आईची माया

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर
2

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Meenatai Thackeray statue : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग; शिवसैनिक आक्रमक, वातावरण तापणार?
3

Meenatai Thackeray statue : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग; शिवसैनिक आक्रमक, वातावरण तापणार?

Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; नागलाबंदर भागात पुन्हा आंदोलन
4

Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; नागलाबंदर भागात पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.