Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची ही पोचपावती मानली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2026 | 06:56 PM
नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

Follow Us
Follow Us:
  • नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडें निवड
  • रुचिता घोरपडे बदलापूरच्या नगराध्यक्ष
  • राज्यातील 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व
महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची निवड करण्यात आली. मुंबई पार पडलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या महासंघात राज्यातील 393 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. महत्त्वाचं म्हणजे महासंघाच्या कार्यकारणी समितीत अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड करण्यात आली.

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे विषय सरकार दरबारी मांडणं, प्रशासनावर अंकुश ठेवणं तसच नगराध्यक्षांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या उद्देशानं महासंघाची स्थापना करण्यात आलीय. गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे महासंघाची कार्यकारणी निवडण्यात आली नव्हती. मात्र आता त्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यामुळे अध्यक्षपदासह कार्यकारणी समिती निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला अनुसरून एकमतानं रुचिता घोरपडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षांना महासंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Exclusive : जखम पोटाला प्लॅस्टर पाठीला! रखडलेला पुनर्विकास, तुटके बांधकाम…, मुंबईतील जगन्नाथ चाळीचं घोडे अडले कुठे?

ज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षांच्या समस्यांना एकत्रित व्यासपीठ मिळावे, तसेच शासनदरबारी त्यांचा आवाज प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने महासंघ कार्यरत आहे. रुचिता घोरपडे या यापूर्वीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय राहिलेल्या असून, प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यांच्या निवडीमुळे महासंघाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महासंघाच्या अध्यक्ष म्हणून त्या राज्यातील विविध नगराध्यक्षांमधील समन्वय वाढवणे, विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी शासनाशी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच नागरी भागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी ठोस धोरणात्मक पावले उचलणे, यावर भर देणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, शहरी विकास प्रकल्पांना गती देणे, निधीवाटपातील अडचणी सोडवणे आणि नागरिकाभिमुख प्रशासन उभारणे या दिशेनेही त्या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे नेतृत्व आणि नव्या धोरणांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

Web Title: Ruchita ghorpade elected as president of municipal council federation arun dhote elected as vice president unanimously

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.