"आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर....", संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन (फोटो सौजन्य-X)
Sanjay Raut on Eknath shinde News Marathi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो लावण्वर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. मात्र याचदरम्यान आता खासदार राऊतांनी आनंद दिघे यांच्यावर केले वादग्रस्त विधानानंतर राऊत यांच्या विरोधात ठाण्यात आंदोल करण्यात येत आहे.
या आंदोलनादरम्यान संजय राऊतांचा ठाण्यात पुतळा जाळण्यात आला. दिघे नेते, उपनेते नव्हते केवळ जिल्हाध्यक्ष असल्याचे होतं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते. ते फक्त जिल्हाध्यक्ष होते. दिघे यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
‘बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता. हे कोणती नवीन पद्धत आहे. आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकाही होते. ते शिवसेनेचे नेते नव्हते, ते उपनेतेही नव्हते. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांच्या बाजूल तुम्ही एक अजून एक फोटो लावला आहे’, असे संजय राऊत म्हणाले.
‘बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते.आनंद दिघे हे शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच तुम्ही जिल्हाप्रमुखांना काय दाखवता? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना? की बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व अजून कमी करा असा त्यांचाचा हा आदेश आहे?’ असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही टीका केली.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “शिंदे यांचे नेते मोदी आहे. तुम्ही बाळासाहेबाच्या बाजुला जिल्हाप्रमुखाचे फोटो लावता. ही कोणती नवी पद्धत आणली. आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँड चे महत्व कमी करायचं आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का?”