Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा “जन संवाद”, शेकडो तक्रारींचे होणार निवारण

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी आनंद आश्रमात आज मंगळवार ४ मार्चपासून ‘जन संवाद’ उपक्रमाचा श्रीगणेशा केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2025 | 05:16 PM
आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा "जन संवाद"

आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा "जन संवाद"

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत आनंद आश्रमात आज मंगळवार रोजी ‘जन संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण यावेळी केले.

होळी, रंगपंचमीला अश्लील गाणे, रंगीत पाणी शिंपडलेत तर याद राखा; मुंबई पोलिसांकडून गाईडलाईन्स जारी

तसेच दर मंगळवारी आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठामपा संबधित नागरीकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ‘ठाणे’ ठाण्याची ‘शिवसेना’ हे ब्रीद जपत आजवर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेच. तर, आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळीनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जन संवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम आयोजित केला होता.

* अतिक्रमण विषय
* कर आकारणी नव्याने करा करणे
* इमारतीमधील समस्यांचे विषय
* झाडे तोडणे नालेसफाई
* स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत करण्याबाबत विषय
* पाण्याच्या बिलाबाबतचे विषय / नवीन जोडणी करणे
* विभागामध्ये विद्युत लाईट नसणे
* आर्थिक फसवणूक व मदत मिळण्याबाबत इमारत विकासकांच्या विषयी तक्रारी
* दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न दुकानांचे
* वाहतूक विभागातील समस्या रोड लगतच्या पार्किंगमुळे होणाऱ्या त्रास अनधिकृत पार्किंग यासारखे विषय आनंद आश्रमात आयोजित जन संवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले.

संतोष देशमुखांपासून खोक्याभाईपर्यंत, परळीत नेमकं काय घडतयं? अजय मुंडेंनी स्पष्टचं सांगितलं

Web Title: Shiv sena leaders hold jan samvad at anand ashram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.