Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवक्रांती प्रतिष्ठानचा उपक्रम यशस्वी; भिवंडीतील शिवाजी महाराज शक्तिपीठाला राज्य सरकारकडून ‘ब’ दर्जा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 12:15 PM
शिवक्रांती प्रतिष्ठानचा उपक्रम यशस्वी; भिवंडीतील शिवाजी महाराज शक्तिपीठाला राज्य सरकारकडून ‘ब’ दर्जा

शिवक्रांती प्रतिष्ठानचा उपक्रम यशस्वी; भिवंडीतील शिवाजी महाराज शक्तिपीठाला राज्य सरकारकडून ‘ब’ दर्जा

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीतील मराडे पाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा मंजूर.
  • सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेले भव्य मंदिर वर्षभरापूर्वी भाविकांसाठी खुले झाले.
  • प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे. राज्यातील हे पहिलेच भव्य स्वरूपाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असल्याचे मानले जात असून या निर्णयामुळे या परिसराच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेले हे मंदिर अवघ्या वर्षभरापूर्वी भाविकांसाठी खुले करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या तेजस्वी इतिहासाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे शक्तिपीठ उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या उभारणीमागे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचा पुढाकार असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य प्रकल्प साकारण्यात आला आहे.

Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संपूर्ण प्रकल्पासाठी आठ कोटींचा खर्च

मंदिराच्या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या निधीपैकी काही खर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर काही निधी लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. मंदिराच्या उभारणीची रूपरेखा आणि संकल्पना ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. तर मंदिराचे वास्तुशिल्प आणि अभियांत्रिकी रचना वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी साकारली आहे.

योगीराज यांच्या मूर्तीमुळे मंदिराचे वाढले आकर्षण

या मंदिराचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्थापित करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. ही मूर्ती सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते साकारण्यात आली आहे. अयोध्येतील भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची निर्मिती करणारे म्हणून प्रसिद्ध असलेल्या योगीराज यांनी घडविलेल्या या मूर्तीमुळे मंदिराचे आकर्षण अधिक वाढले आहे. हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचे ठरत आहे. या शक्तिपीठात दररोज शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाची माहिती मिळावी यासाठी विविध शाळांच्या शैक्षणिक सहलीही येथे आयोजित केल्या जात आहेत. मंदिर परिसरात इतिहासाचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या शिल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्येही या ठिकाणाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण होत आहे.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

ब दर्जासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

  • या शक्तिपीठाला पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे.
  • हा मानाचा दर्जा मिळवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते.
  • विशेषतः किसन कथोरे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव पुढे सरकला असल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावाला अंतिम मान्यता देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याचेही डॉ. राजू चौधरी यांनी स्पष्ट केले.
  • या निर्णयामुळे राज्यभरातील शिवभक्त आणि पर्यटकांचे आकर्षण या शक्तिपीठाकडे अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येता आहे.
  • पर्यटनाचा दर्जा मिळाल्यामुळे भविष्यात मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पर्यटन सुविधा आणि स्थानिक व्यवसाय यांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Shivaji maharaj shaktipeeth bhiwandi gets b grade tourism status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • thane
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
1

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
2

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
3

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
4

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.