फोटो सौजन्य सोशल मिडिया
या कालावधीत ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांनासुद्धा पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी या विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांनी व वाहनचालकांनी होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी, या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि परिसरात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अशी आवाहान वाहतूक पोलिस विभागा मार्फत करण्यात आले आहे.
बेलापूर कडे जाणाऱ्या सहा चाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनाना दिघा येथील मुकुंद कंपनी येथून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे.तर चारचाकींना भारत बिजली चौकातून उजवीकडे जाऊन ऐरोली फायर ब्रिगेड चौकातून डाव्या साईडने खेडेकर चौक मार्गे पर्यंत रस्ता मोकळा केला आहे.
तर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्यांना रबाळे नाका सिग्नल येथून उजवीकडे वळून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनी मार्गे पुढे जाण्यासाठी मार्ग आहे. पटणीमार्गे जाणाऱ्यांसाठी रबाळे नाका-दिवागाव सर्कल-पटणी रोड मार्ग उपलब्ध असतील.
उद्या ठाणे- बेलापूर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. एमएमआरडीएकडून एक महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून, ऐरोली- काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या तसेच 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
पण याचा फटका प्रवाशांवर होणार आहे. प्रवाशांसाठी रेल्वेहा पर्याय उत्तम असणार आहे. जर तुम्हाला रात्री 11 नंतर ठाणे ते वाशी ते पनेवल असा प्रवास करायचा आहे. तर ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन हा सर्वात वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित पर्याय असेल, एमआयडीसीचे अंतर्गत रस्ते काही ठिकाणी अरुंद किंवा वळणावळणाचे असल्याने रात्रीच्या वेळी गोंधळ टाळण्यासाठी गुगल मॅपचा वापर करा तसेच ‘लाईव्ह ट्रॅफिक’ चा वापर करून प्रवास करा.






