Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार की जनतेची थट्टा? रोहिदास मुंडे यांचा खोचक सवाल

दिवा वासियांना पायाभूत सुविधा मिळत नाही आणि खासदार साहेब मात्र... रोहिदास मुंडे यांनी  श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. काय म्हणाले रोहिदास मुंडे जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 13, 2025 | 08:15 PM
Thane News : डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार की जनतेची थट्टा? रोहिदास मुंडे यांचा खोचक सवाल
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा येथे आयोजित केलेल्या “जनता दरबाराबाबत विरोधी पक्षनेते रोहिदास मुंडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. रोहिदास मुंडे जनता दरबारावर टीका म्हणाले की, या सगळ्या दरबाराचा गाजावाजा केला जात असताना, दिव्यात मात्र मागील अकरा वर्षांत एकदाही जनता दरबार भरलेला नाहीही वस्तुस्थिती किती त्रासदायक आणि दु:खद आहे, हे आज प्रत्येक दिवेकराला प्रकर्षानं जाणवत आहे अशी खंत कल्याण ग्रामीण विभाग विधानसभा प्रमुख ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

दिवा विभागातील जनता आजही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.हॉस्पिटल नाही,गार्डन नाही,तलाव मृत अवस्थेत,आणि पाण्याची टंचाई, अनधिकृत बांधकामे, कचऱ्याचा प्रश्न, वीज पुरवठा या समस्यांनी सामान्य जनतेचं जगणं असह्य केलं आहे. दिवा भागातील नागरिकांना पायाभूत सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या सततच्या आव्हानांना नागरिक सामोरे जात आहेत. या अशा गंभीर पार्श्वभूमीवर, कळवा येथे ‘जनता दरबार’ घेऊन फोटोंमध्ये बुडालेलं लोकप्रतिनिधित्व हे दिवेकरांसाठी फक्त थट्टा वाटतेय. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Thane News: शहरातील पाणी साचणाऱ्या भागांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडून पाहणी

जनता दरबार कलवा,डोंबिवली,उल्हासनगर येथे केले जाते मग दिव्यातल्या जनतेचे प्रश्न खासदार कधी सोडवणार ? असा खोचक सवाल देखील रोहिदास मुंडे यांनी श्रीकांत शिंदे यांना केला आहे. मुंडे पुढे असंही म्हणाले की, “खासदार साहेब, दरबाराचा लोकशाहीत सन्मान आहे, पण तो दरबार जर “जनतेसाठी” नसून “प्रचारासाठी” घेतला जात असेल, तर त्याचं रूपांतर केवळ नाट्यशैलीतील दिखाव्यात होतं. दिव्यातील नागरिक विचारतात दिवा शहर तुमच्या मतदारसंघातच आहे ना? मग इथं दरबार कधी होणार? की दिवा शहर तुमच्या नकाशातूनच गायब झालंय?जनतेच्या मनात आता एकच सवाल आहे” .’कामाचा दरबार कधी, की अजूनही फक्त फोटोच?’ अशी जहरी टीका देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

“… तर मुंबईत मोठी जीवितहानी होऊ शकते”; आमदार दिलीप लांडे यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: Thane news dr shrikant shindes janata darbar or a mockery of the people rohidas mundes sarcastic question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • Latest Political News
  • Thane news

संबंधित बातम्या

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु
1

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला
2

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप
3

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
4

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.