राज्याच्या राजकारणात सध्या एका वादाने चांगलाच पेट घेतला आहे. हा वाद मराठी हिंदी भाषा. राज्यात हिंदी भाषेची सक्ती केल्याने हा वाद आता दिवसेंदिवस चिघळत जात आहे. हिंदी भाषेची सक्ती केल्याने यावर नेतेमंडळींमध्ये बरेच आरोप प्रत्यारोप होत असल्याचं देखील दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेच्या
नेत्यांनी आक्रमक पावित्रा हाती घेतला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काही भैय्ये व विशेषतः मराठी भैय्ये हिंदीचे समर्थन करताना मराठी ला आई ची व हिंदी ला मावशीची उपमा देतात. त्यांनी अभ्यास केल्यावर त्यांना कळेल की मराठीच्या मानाने नुकतीच तयार झालेली ही हिंदी भाषा प्रेमळ मावशी नाही तर ‘पुतना मावशी’ आहे.आपली मायमराठी टिकवायची असेल तर या मावशीला चार… pic.twitter.com/49T1pCe1Xg
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 20, 2025
सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू पाटील यांनी हिंदी भाषेबाबत परखड शब्दात टीका केली आहे. राजू पाटील म्हणाले की, हिंदी भाषा प्रेमळ मावशी नाही तर पूतना मावशी आहे. आपली मायमराठी टिकवायची असेल तर या मावशीला चार हात लांब ठेवावे लागेल. त्याचबरोबर पाटील यांनी त्यांच्या ट्वीट सोबत कोणत्या राज्यात कोणत्या भाषा बोलल्या जातात याचा नकाशाही ट्वीट केला आहे. इतकेच नाही तर हिंदी भाषेचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांची शाळा घेतली आहे.
राज्यात हिंदी भाषा शिक्षणात सक्तीची केली आहे. त्यामुळे राज्यात एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. विविध राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सोयीनुसार भाष्य करीत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहायचे असल्यास त्यांना मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. अन्य भाषांची महाराष्ट्रात सक्ती करु नये यावर ते ठाम आहेत. या प्रकरणावर मनसेनेचे नेते राजू पाटील यांनी भाष्य केले आहे. हिंदी भाषेचे समर्थन करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले राजू पाटील ?
काही भैय्ये व विशेषत: मराठी भैय्ये हिंदीचे समर्थन करताना मराठीला आईची व हिंदीला मावशीची उपमा देतात. त्यांनी अभ्यास केल्यावर त्याना कळेल की मराठीच्या मानाने नुकतीच तयार झालेली ही हिंदी भाषा प्रेमळ मावशी नाही तर पुतना मावशी आहे आपली मायमराठी टिकवायची असेल तर या मावशीला चार हात लांब ठेवलेलेच बरे