Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: “अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला किमान 33 हजारांचे कर्ज द्या!” शरद पवार गटाची LIC कार्यालयावर धडक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि अदानींविरोधात ठाण्यातील एलआयसी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 27, 2025 | 09:48 PM
शरद पवार गटाची LIC कार्यालयावर वर धडक

शरद पवार गटाची LIC कार्यालयावर वर धडक

Follow Us
Follow Us:

अदानी समूहाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी केला आहे. एलआयसीवर दबाव आणून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तब्बल 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचे कर्जही मिळत नाही, या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे ठाण्यातील एलआयसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी “मोदी-अदानी भाई भाई”, “या सरकारचे करायचे काय वरती डोके, खाली पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी

आंदोलनकर्त्यांनी विभागीय व्यवस्थापक रूपा भंडारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी म्हटले की, “जर अदानीसारख्या मोठ्या उद्योगसमूहाला 33 हजार कोटी रुपये देता येतात, तर आम्हा बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली कर्ज का दिले जात नाही?” एलआयसीने तरुण उद्योजकांना सुलभ कर्ज योजना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Ghatkopar Fire: 200 पेक्षा जास्त नागरिकांना आगीने घेरले; घाटकोपरच्या १३ मजली इमारतीमध्ये भीषण तांडव

मनोज प्रधान म्हणाले, “वाॅशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार एलआयसीने अदानी समूहात 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून एकूण गुंतवणूक 60 हजार कोटींवर पोहोचली आहे. हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अनेक बँका अदानी समूहाकडून कर्जवसुली करत असताना, अशा परिस्थितीत एलआयसीने गुंतवणूक करणे ही गंभीर बाब आहे. एलआयसीमध्ये 30 कोटी जनतेचा पैसा आहे. तो सरकारच्या सांगण्यावरून कोणत्याही खासगी समूहाला देऊ नये. जर हा समूह बुडाला, तर जनतेच्या पैशावर गदा येईल. सरकारने एलआयसीवर टाकलेला दबाव तत्काळ थांबवावा आणि एलआयसीने स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राखावे.”

Web Title: Thane news ncp sharad pawar party protest against adani and narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Adani
  • LIC
  • Protester
  • Sharad Pawar NCP
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!
4

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.