घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग
घाटकोपरमधील इमारतीला भीषण आग
इमारतीमध्ये 200 पेक्षा जास्त लोक अडकल्याचा अंदाज
अग्निशमन दलाने सुरू केले बचावकार्य
घाटकोपर: घाटकोपरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. घाटकोपरमधील १३ मजली रविशा टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. रवीशा टॉवर ही इमारत घाटकोपर रेल्वेस्थानकाजवळ आहे. तिथे अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील १३ मजली रविशा टॉवर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही इमारत कमर्शियल वापरासाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. आग लागली तेव्हा 200 हून अधिक लोक इमारतीत उपस्थित होते. अजूनही काही लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. इमारतीचा बहुतांश भाग काचांनी बंदिस्त असल्यामुळे आतमध्ये धूर आणि उष्णतेमुळे आग धुमसत राहिल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना परिसरात गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबईतील बिल्डिंगला भीषण आग
नवी मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये महिला आणि 6 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश असल्याचे समजते आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत.
नवी मुंबईमधील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 10 व्या मजल्याला आग लागल्याचे समोर आले आहे. ही आग 12 व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली.
Fire News: नवी मुंबईतील बिल्डिंगला भीषण आग; 6 वर्षांच्या चिमुकलीसह…; पहा Video
आगीची तीव्रता इतकी भयानक होती की अनेक जण त्या घटनेत जखमी झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 वर्षांच्या मुलीचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तर यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. आगीत जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.






