Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : दहीहंडी उत्सवात जपले जाणार सामाजिक भान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळणार आर्थिक मदत

नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्थसाहाय्य करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 14, 2025 | 02:30 PM
Thane News : दहीहंडी उत्सवात जपले जाणार सामाजिक भान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळणार आर्थिक मदत
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे /स्नेहा जाधव,काकडे : नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे तर दिली जाणारच आहेत. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपयांचे अर्थसाहाय्य देखील करण्यात येणार आहे.

गौरव स्वीट समोर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक (हैप्पी वेली), टिकूजिनीवाडी रोड, मानपाडा, येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचे संस्थापक, भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष रमेश बा. आंब्रे व मा. नगरसेविका व मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. स्नेहा रमेश आंब्रे व मंडळाचे मार्गदर्शक व सरचिटणीस व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉ. सागर रमेश आंब्रे यांच्या पुढाकारातून या दहीकाला तथा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे 21 वे वर्ष आहे.

Thane News : “नाद करा पण आमचा कुठं” ; स्पेनचे गोविंदा देणार मानवी मनोरे रचून सलामी

या उत्सवास 15 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्णजन्मोत्सवाने सुरूवात होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे – मुंबईतील अनेक गोविंदाना निमंत्रण देण्यात आले असून 1 लाख 11 हजार 111 रूपयांचे पहिले पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे. तसेच,4 ते 7  थराच्या पथकांना विशेष पारितोषिके;7 थर लावणाऱ्या पथकास स्नेहा ताई नारीशक्ती गौरव पुरस्कार; 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान पुरस्कार आणि 9 थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मानाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्र मंडळ (रजि.) तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला1 लाख 11 हजार 111 रूपये रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे.

Thane News : दहीहंडी उत्सवात जपले जाणार सामाजिक भान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळणार आर्थिक मदत

दरम्यान, या उत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री, अजित दादा पवार , भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , वनमंत्री गणेश नाईक साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हेदेखील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख सल्लगार तथा ऑल इंडिया बंजारा समाज सेवा संघ अध्यक्ष शंकर पवार, प्रमुख सल्लागार मनोज सिंग, मंडळाच्या सदस्या डॉ. श्रुती सागर आंब्रे, आदी मंडळ पदाधिकारी व सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Thane news social awareness will be maintained during dahi handi festival chief ministers relief fund will receive financial assistance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.