Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाकरे गटाचा मोठा निर्णय; रोहिदास मुंडे यांच्यावर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची सोपवली जबाबदारी

दिव्यातील शिवसैनिक रोहिदास मुंडे यांच्यावर मातोश्रीने विश्वास दाखवत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2025 | 03:20 PM
Thane News : ठाकरे गटाचा मोठा निर्णय; रोहिदास मुंडे यांच्यावर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची सोपवली जबाबदारी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे स्नेहा जाधव काकडे :- दिव्यातील शिवसैनिक रोहिदास मुंडे यांच्यावर मातोश्रीने विश्वास दाखवत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रोहिदास बामा मुंडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उभारी देण्याचे काम मुंडे यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा येथील शिवसैनिक व्यक्त करत आहेत. आगामी महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रमक चेहऱ्यांना संधी पक्षाकडून दिली जात आहे. रोहिदास मुंडे यांची आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बुलंद आवाज असणारे रोहिदास मुंडे यांना विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्याने आगामी काळात कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज अधिक बुलंद होईल असा विश्वास स्थानिक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते विनायक राऊत,राजन विचारे, उपनेते व कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली मला जी जबाबदारी पक्षाने दिली आहे, ती पार पाडण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन. त्याचबरोबर महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे”असं रोहिदास मुंडे यांनी सांगितलं आहे.

Web Title: Thane news thackeray groups big decision rohidas munde entrusted with the responsibility of kalyan rural assembly chief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • shivsena
  • ubt sena news
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
1

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
2

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
3

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
4

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.