राज्यातील पहिली 'प्रीपेड रिक्षा सेवा' ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!
स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पथदर्शी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष प्रीपेड रिक्षा स्टैंड आणि नियंत्रण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. अॅड. निरंजन डावखरे यांच्या गेल्या दीड-दोन वर्षांच्या अथक पाठपुराव्यातून ही योजना प्रत्यक्षात उतरली आहे.
या उद्द्घाटन सोहळ्यास आमदार संजय केळकर, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत यांच्यासह शेकडो रिक्षाचालक उपस्थित होते.प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक व्हावा, तसेच रिक्षाचालक बांधवांना शिस्तबद्ध, सन्मानजनक आणि सुव्यवस्थित व्यवसायाचे वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रीपेड रिक्षा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार असल्याने भाड्याबाबतची अनिश्चितता दूर होऊन अधिक पारदर्शक सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांसाठीही शिस्तबद्ध कार्यपद्धती निर्माण होऊन प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांना अधिक सुसूत्र सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.
सुरक्षित व्यवस्थापन उपलब्ध करून देणारी सुविधा
महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम म्हणून सुरू झालेली ही प्रीपेड रिक्षा व्यवस्था ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना निश्चित भाडे, पारदर्शकता, सुरक्षितता आणि अधिक सुसूत्र प्रवासाची सुविधा देण्यासोबतच रिक्षाचालकांना त्यांच्या कष्टाच्या उत्पन्नाचे अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्यवस्थापन उपलब्ध करून देणारी ठरणार आहे.
‘सिटीफ्लो’च्या माध्यमातून अत्याधुनिक व्यवस्थापन





