ठाणे : एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून पोलिसांना या प्रकरणी कारवाई केली आहे.
[read_also content=”भीषण बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू, ४ घरे जमीनदोस्त, काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, आयबीने काही दिवसांपूर्वी दिला होता अलर्ट https://www.navarashtra.com/india/father-two-trains-will-collide-with-each-other-at-full-speed-the-railway-minister-himself-will-board-a-train-nrab-248936.html”]
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहनचालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होते. इतक्यात बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला व कार चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. हे दृश्य एका नागरिकाने पाहिले काही अनुचित प्रकार घडू शकतो या संशयातून त्याने हा प्रकार मोबाईल मध्ये कैद करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच दरम्यान वाहतुक पोलिसांनी व्हिडियोच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला. प्रवीण चौधरी असं या कारचालकाचं नाव आहे. प्रवीण याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचे संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला त्याने आधारवाडी चौकात अडवून वाद घातला. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी शहर पोलिसांनी देखील कारवाइ केली पाहिजे होती. हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून पोलीस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[read_also content=”बापरे! दोन रेल्वेगाड्या फुल स्पीडने एकमेकींना टक्कर देणार ; एका रेल्वेत खुद्द रेल्वेमंत्री चढणार.. https://www.navarashtra.com/india/father-two-trains-will-collide-with-each-other-at-full-speed-the-railway-minister-himself-will-board-a-train-nrab-248936.html”]