
Woman Delivery in Rickshaw : उल्हासनगरमध्ये रिक्षात महिलेची सुखरूप प्रसूती; पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांची तत्परता!
पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे उल्हासनगरमध्ये एका महिलेची रिक्षातच सुखरूप प्रसूती झाल्याची (Woman Delivery in Rickshaw) घटना समोर आली आहे. सेंट्रल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या या घटनेत पोलीस कर्मचारी सतीश करले यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेला वेळेत मदत मिळाली.
उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गार्ड ड्युटीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी सतीश करले हे हॉस्पिटलसमोर फेरफटका मारत होते. त्यांना अचानक हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षातून महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने रिक्षाकडे धाव घेतली असता, संबंधित महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, महिलेच्या प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात बाळाचा काही भाग बाहेर आला होता. हे सर्व पाहता, गांगरलेला महिलेचा पतीही मदतीसाठी विनंती करत होता. त्याला काय करावे अन् करू नये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने करले तेथे पोहचले व त्यांनी तातडीने डॉक्टरांना घटनेची माहिती दिली. तसेच करले यांनी महिलेच्या पतीलाही धीर दिला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी सतीश करले यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व डॉक्टरांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनाही वेळ न दवडता तातडीने ते रिक्षाजवळ पोहोचले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रिक्षातच महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या महिलेने एका गोंडस बाळाला रिक्षातच जन्म दिला.
ऐनवेळी दाखवलेली तत्परता आणि योग्य समन्वय यामुळे प्रसूतीच्या वेळी महिलेला मदत मिळाली. पोलीस कर्मचारी सतीश करले आणि डॉक्टरांनी वेळीच धाव घेतल्याने या कठीण प्रसंगात महत्त्वाची मदत त्या दाम्पत्याला मिळाली. दरम्यान, आई व बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर सेंट्रल रुग्णालयातच पुढील उपचार सुरू आहेत.
Ans: उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या रिक्षात महिलेची प्रसूती झाली.
Ans: पोलीस कर्मचारी सतीश करले आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्परतेने मदत केली.
Ans: पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मदतीने रिक्षातच महिलेची प्रसूती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. 5. ही घटना कुठे घडली? ही घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.