Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट

भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 03:31 PM
भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट

भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीत अनधिकृत शाळांची संख्या 18 वरून 21 वर पोहोचली, चिंतेत वाढ
  • संबंधित शाळांना नोटीस; नियम न पाळल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
  • विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनमान्य शाळांमध्ये समायोजनाची तयारी
ठाणे जिल्ह्यात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत अनधिकृत बांधकामांबरोबरच अनधिकृत शाळांचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. नियम धाब्यावर बसवून परवानगीशिवाय सुरू असलेल्या अशा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तब्बल २१ अनधिकृत शाळांची अधिकृत यादी जाहीर करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी शहरात १८ अनधिकृत शाळा सुरू होत्या. मात्र वर्षभरात आणखी तीन शाळांची भर पडल्याने हा आकडा २१ वर पोहोचला आहे. ही वाढ चिंताजनक मानली जात असून, नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या शाळांवर आता कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत पालिकेकडून देण्यात आले आहेत.

Raigad News: नेरळ-खांडा पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मनसेकडून चौकशीची मागणी

शाळा प्रशासनाला बजावली नोटीस

प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळा प्रशासनाला नोटिसा बजावत स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ शाळा बंद कराव्यात, अन्यथा संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करण्याचाही निर्णय घेतला आहे. अशा शाळातील विद्याथ्यांचे समायोजन शासनमान्य शाळांमध्ये करण्यात येणार असून, शिक्षणात खंड पडू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

विद्याथ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी होतोय खेळ

यंदा नव्याने समाविष्ट झालेल्या शाळांमध्ये ए. बी. इंग्रजी प्राथमिक शाळा (भैरव सायझिंग समोर), विद्या निकेतन इंग्रजी प्राथमिक शाळा (भंडारी कंपाऊंड) आणि सरस्वती इंग्रजी प्राथमिक शाळा (नवी वस्ती) यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या अशा शाळांमुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ होत असल्याची गंभीर बाबसमोर आली आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून केवळ शासनमान्य शाळांमध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा, असे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

अनधिकृत शाळांना दंडात्मक कारवाई सुरू

अनधिकृत शाळा चालविणाऱ्याांविरोधात दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात लवकरच फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या १८ शाळामध्ये यंदाही समावेश असून त्यात रॉयल इंग्रजी शाळा (पटेल कंपाउंड, धामणकर नाका), नोबेल इंग्रजी शाळा (अवचितपाडा), अलरजा उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर), मराठी प्राथमिक शाळा (पाईपलाईन टेमघर), इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा (पाईपलाईन टेमघर), द लर्निंग प्राथमिक शाळा (टेमघर पाडा), एकता इंग्रजी पब्लिक शाळा व एकता उर्दू पब्लिक शाळा (फातमा नगर, नागांव), ए.आर. रेहमान उर्दू प्राथमिक शाळा, जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर), विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा (नवी वस्ती), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा (रावजी नगर, पॉवर हाऊस जवळ), अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा (पटेल नगर, बाळा कंपाउंड), तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा (जैतनपुरा), इकरा इस्लामिक मकतब शाळा (नदी नाका), कैसर बेगम इंग्रजी शाळा (नागांव, सहारा हॉटेलजवळ) आदी शाळांचा समावेश आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Unauthorized schools surge in bhiwandi 21 institutions under scanner strict action likely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
4

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.