
Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
तुम्हाला प्रश्न पडला असेल की तामिळनाडूत मराठी संमेलन का? तर त्याला मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरला दक्षिणेत मराठा साम्राज्य उभं केलं होतं. त्यानंतर सरफोजीराजे भोसले द्वितीय यांनी तंजावरला मराठी संस्कृतीचं केंद्र बनवलं. त्यांनी साहित्य, कला, संस्कृतीसाठी खूप मोठं काम केलं. म्हणूनच या पहिल्या संमेलनाला त्यांचंच नाव दिलं आहे. Maharashtra News:
या निमित्ताने मराठी आणि तमिळ या दोन भाषांना जोडण्याचा आणि आपली कला संस्कृती जपण्याचा मोठा प्रयत्न होणार आहे.
पुण्याहून मिळालेल्या माहितीनुसार, 23 तारखेला बुधवारी दुपारी 3.30 वाजता या संमेलनाची सुरुवात होईल. सगळ्यात आधी ग्रंथ दिंडी निघणार आहे. श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले स्मारक, कलादालन, राजमहाल परिसरातून ही दिंडी निघेल. मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या हस्ते दिंडीचं पूजन होईल. त्यावेळी अश्विनी भगत, पल्लवी गोरे, सुधीर चव्हाण, रंजना भोईटे हे पाहुणे म्हणून असतील.
त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता बृहदेश्वर मंदिराजवळच्या पेथनन कलैयरंगम सभागृहात मुख्य संमेलनाचं उद्घाटन होईल. तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आणि या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्ष असतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे. यावेळी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष युवराज संभाजीराजे भोसले, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि इतर मान्यवर उपस्थित असतील.संध्याकाळी 6 वाजता एक भारी परिसंवाद होणार आहे. प्रा. दीप्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होईल. यामध्ये आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली सगळीकडून साहित्यिक येणार आहेत.
त्यानंतर 6.30 वाजता कविसंमेलन होईल. पुण्याचे प्रसिद्ध कवी रमेश रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन रंगणार आहे. यावेळी सूर्यकांत नामुगडे यांच्या “सावल्या” या कविता संग्रहाचं प्रकाशन पण होणार आहे. बेळगाव, अमरावती, नाशिक, खोपोली, पुणे अशा सगळ्या ठिकाणांहून कवी मंडळी येणार आहेत.
रात्री 8 वाजता समारोप आणि पुरस्कार वितरण होईल. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिले जाणार आहेत. जसं की आरती झोटिंग यांना साहित्यरत्न, डॉ. नंदकुमार राऊत यांना युवा साहित्यरत्न, गणेश आघाव यांना कलारत्न असे अनेक पुरस्कार दिले जाणार आहेत.
या संमेलनाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पंढरपूर पासून एक ग्रंथदिंडी निघणार आहे. 21 तारखेला फुलचंद नागटिळक यांच्या नेतृत्वाखाली “पंढरीची वारी, साहित्य संमेलनाच्या दारी” या नावाने ही दिंडी पंढरपूर ते सोलापूर पायी जाणार आहे. आणि मग सोलापूरहून रेल्वेने थेट तंजावरला जाणार आहे.
Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई, पुणे, सोलापूर मधून शेकडो साहित्यिक या रेल्वेने जाणार आहेत आणि धावत्या रेल्वेतच साहित्याचं संमेलन रंगणार आहे. शाळेच्या मुलांच्या कवितांचं वाचन पण होणार आहे. खरंच, मराठीचा हा झेंडा असाच फडकत राहो.