Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

ठाण्यात १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. अत्याचाराची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणी अनेक महिने गप्प राहिली.m अखेर तिने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. कापूरबावडी पोलिसांनी दोन

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 03:43 PM
Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्...

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्...

Follow Us
Follow Us:
  • चुलत भावांकडून अत्याचाराचा आरोप
  • धमकीमुळे पाच महिने गप्प
  • दोघांना अटक; अल्पवयीन ताब्यात
ठाणे : ठाण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा:Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

धमकीमुळे अनेक महिने गप्प

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांकडून ठाण्यातील कोपरी आणि कोलशेत परिसरातील घरांमध्ये वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणी घाबरली होती. त्यामुळे ती अनेक महिने हा प्रकार सहन करत गप्प राहिली. मात्र, आरोपींचा त्रास वाढत गेल्यानंतर तिने धाडस करून आईला संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीने सांगितलेला प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर… 

कोपरीत गुन्हा, तपास कापूरबावडीकडे

सुरुवातीला कोपरी पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान अत्याचाराच्या घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील तपास कापूरबावडी पोलिसांकडे सोपविण्यात आला. कापूरबावडी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली, तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आरोपीला भिवंडी येथील बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत असून, तक्रारीतील आरोप आणि प्रत्येक आरोपीची भूमिका याबाबत चौकशी सुरू आहे.

Web Title: Thane crime 19 year old girl assaulted by cousins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • maharashtra news
  • POCSO
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
1

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
2

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
4

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.