
Disha Salian Case and Aaditya Thackeray:
सतीश सालियन यांनी सीबीआयला पत्र लिहीले आहे. या पत्रात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतरांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात भादंवि (IPS) कलम ४०९ जोडण्यासह कथित बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि प्रकरण दडपण्याबाबत प्रत्यक्षदर्शी व इतर महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. Satish Salian Defamation Notice To Aaditya Thackeray In Disha Salian Case
दिशा सालियान प्रकरणात आयपीसी ४०९ कलम लावण्यासोबतच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याची आणि चौकशी करण्याची मागणी होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, पुरेसे पुरावे असल्याशिवाय या विषयावर अजिबात बोलू नका पुराव्यांशिवाय कोणत्याही विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे बजावले आहे.
दुष्काळाची भीषण तीव्रता झाली असह्य; पावसासाठी गणरायाला साकडे
आदित्य ठाकरे यांनी 16 सप्टेंबरला आपण दिशा सालियन यांना ओळख नसल्याचे सांगत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. यावरुन आदित्य ठाकरे यांना मानहानीची नोटीस जारी केल्याचे सांगितले जात आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप आपल्याला उद्देशून असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत असताना आपल्यावर राजकीय हेतू आणि वैयक्तिक वैमनस्यातून आरोप केले जात असल्याचा आक्षेप सतीश सालियन यांनी घेतला आहे.
कायदेशीर नोटीस बजावताना अडथळा निर्माण होण्याची किंवा सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सतीश सालियन आणि त्यांच्या कायदेशीर टीमला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि कायदेशीर चौकशी व्हावी, यासाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे सतीश सालियन यांनी म्हटले आहे.