Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ट्रेनमध्ये तिकीट नसेल तर TTE दंड करतो हे सगळ्यांना माहीत आहे. पण दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेस (12792) मध्ये एक असा धक्कादायक प्रकार घडला आहे की ज्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतोय. दानापूरहून प्रयागराजला जाणाऱ्या एका तरुणीकडे AC 2-टायर कोचचं तिकीटच नव्हतं. TTE ने तिकीट मागितलं तर तिने जे केलं ते पाहून सगळेच हैराण झाले. Viral Train Video:
ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे TTE तिकीट तपासत होता. त्याने या तरुणीकडे तिकीट मागितलं. पण तिच्याकडे तिकीट नव्हतं. तिने तिकीट दाखवायलाच नकार दिला. TTE ने सांगितलं की नियमानुसार तुम्हाला तिकीट बनवून दंड भरावा लागेल. एवढं सांगताच ती तरुणी एकदम भडकली आणि TTE सोबत जोरजोरात भांडायला लागली.
भांडण वाढतच गेलं आणि मग तिने TTE ला धमकवायला सुरुवात केली. ती म्हणाली, “तू माझ्या भावाला ओळखत नाहीस, तो तुझ्यापेक्षा मोठा TTE आहे.” तिने स्वतःचं नाव राधिका तिवारी सांगितलं आणि तिच्या भावाचं नाव मुन्ना तिवारी असल्याचं सांगितलं. माझा भाऊ रेल्वेत आहे, तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी तिने दिली. TTE ने तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती.
यानंतर जी घटना घडली ती सगळ्यात धक्कादायक होती. वाद खूप वाढल्यावर त्या तरुणीने अचानक स्वतःचेच कपडे ओढून फाडायला सुरुवात केली. आणि वरून TTE वरच आरोप लावायला लागली की याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं, माझा विनयभंग केला. तिने तर 112 नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावण्याची धमकी पण दिली. तिला वाटलं की असे खोटे आरोप लावले तर TTE घाबरेल आणि तिला सोडून देईल.
पण तिचं नशीब खराब होतं. तिथे असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने आणि TTE ने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की ती स्वतःच कपडे फाडत आहे. त्यामुळे TTE वर लागणारे खोटे आरोप खोटे ठरले. हा व्हिडिओच TTE साठी मोठा पुरावा बनला.
शक्ल से मासूम और ग़रीब दिखने वाली महिला का नाम Radhika Tiwari है! मैडम ट्रेन से कहीं सफ़र कर रही थी जब TTE इनसे टिकट मांगा तो महिला अपना अश्लील रूप दिखाने लगी। बिना कुछ सोचे समझे वो अपने कपड़े फाड़ने लगी ये सोचकर की TT के ऊपर 76 लगवायेंगे। भला हो कैमरामैन का जिसने सही मौके पर… pic.twitter.com/rNNINQfCQQ — रितेश देशमुख ( 𝙿𝚊𝚛𝚘𝚍𝚢 ) (@Deshmukh_0) September 19, 2026
ही ट्रेन जेव्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDDU) जंक्शनवर पोहोचली तेव्हा TTE ने लगेच रेल्वे सुरक्षा दलाला म्हणजे RPF ला बोलावलं. RPF ची टीम आली आणि त्या तरुणीला ट्रेनमधून खाली उतरवलं.
खाली उतरल्यावर पण तिचा धुमाकूळ सुरूच होता. तिथे पण ती पोलिसांचा आणि TTE चा व्हिडिओ बनवत होती आणि आरडाओरडा करत होती.नंतर RPF इन्स्पेक्टर अनिता कुमारी यांनी माहिती दिली की या तरुणीवर ट्रेनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी 1000 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. लोक यावर खूप संताप व्यक्त करत आहेत. विना तिकीट प्रवास करून वरून अशी दादागिरी आणि खोटे आरोप लावणं हे चुकीचं आहे, असं सगळे म्हणत आहेत. TTE ने व्हिडिओ काढला म्हणून तो वाचला नाहीतर त्याच्या नोकरीवरच गदा आली असती.






