Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Jalgaon ITI Garbage Depot Protest: जळगावातील ITI समोरील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. विद्यार्थ्यांनी फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 03:38 PM
Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ITI समोरील कचरा डेपो हटविण्यासाठी ABVPचे ठिय्या आंदोलन.
  • साडेनऊ ते दुपारी एकपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले.
  • महापौर व आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल.
जळगावातल्या ITI समोर असलेला कचरा डेपो हटवण्यासाठी अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. अभाविपने म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने थेट ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर कुठे महापालिका प्रशासनाला जाग आली. सकाळी साडे नऊ वाजता हे आंदोलन सुरू झालं होतं. दुपारी एक वाजेपर्यंत विद्यार्थी तिथेच बसून होते. घोषणा देत होते. हातात फलक घेऊन उभे होते. एवढं मोठं आंदोलन बघून शेवटी महापौरांपासून ते आयुक्तांपर्यंत सगळ्यांना घटनास्थळी यावं लागलं. Jalgaon ITI Garbage Depot Protest:

मोठे अधिकारी आले घटनास्थळी

आंदोलनाची तीव्रता बघून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभागाचे समीर बोरोले यांच्यासह नगरसेवक विशाल भोळे आणि अरविंद देशमुख हे सगळे ITI समोर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलणं केलं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यानंतरच वातावरण थोडं शांत झालं.

फलक आणि घोषणांनी लक्ष वेधलं

विद्यार्थ्यांनी हातात जे फलक घेतले होते त्यावर लिहिलं होतं – ‘स्वच्छ परिसर हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे’, ‘कचरा हटवा, ITI वाचवा’, ‘महानगरपालिकेने एक तास इथे बसून दाखवावं’. अशा घोषणा देत विद्यार्थी प्रशासनाचा निषेध करत होते. रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस थांबून बघत होता. ITI समोर एवढा कचरा साचतो की विद्यार्थ्यांना तिथे बसणं पण कठीण झालंय. दुर्गंधी येते, आजार पसरायची भीती आहे.

या आंदोलनाला प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, महानगर मंत्री आर्यन भालशंकर, महानगर सहमंत्री मनोज कुंभार, ईश्वरी जोशी, स्नेहल महाजन, अमरसिंह राजपूत, वरद पंढरकर यांच्यासह अभाविपचे अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

आयुक्तांनी दिलं लेखी आश्वासन

आंदोलनानंतर आयुक्त आदित्य जीवने यांनी अभाविपला लेखी आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की TB सॅनिटोरियम इथे नवीन कचरा ट्रान्सफर सेंटरचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. उरलेलं काम 30 दिवसात पूर्ण केलं जाईल. जर ठेकेदाराने कामात दिरंगाई केली तर त्याच्यावर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटवर कायदेशीर कारवाई करू.

नवीन केंद्र पूर्ण होईपर्यंत ITI जवळचं जुनं केंद्र सुरू राहील, पण त्याची साफसफाई जास्त चांगल्या प्रकारे केली जाईल. महामार्गालगत कचरा टाकणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई केली जाईल आणि ITI परिसराच्या स्वच्छतेबाबत संबंधितांना नोटीस पण दिली जाईल असं आयुक्तांनी सांगितलं.

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक …

महापौरांच्या मध्यस्थीने वातावरण निवळलं

सुरुवातीला आयुक्तांनी दीड महिन्यात काम पूर्ण करून हा कचरा डेपो बंद करू असं सांगितलं, पण विद्यार्थ्यांनी ते मानलं नाही. त्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली.

तेव्हा महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी मध्यस्थी केली. महापौर म्हणाल्या की ‘हा माझाच प्रभाग आहे, एका महिन्यात हा स्पॉट बंद नाही झाला तर मी स्वतः तुमच्यासोबत आंदोलनाला बसेन’. अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली आणि लेखी आश्वासन द्यायला तयार झाल्या.

त्यांच्या या बोलण्यानंतर विद्यार्थ्यांनी एक इशारा देत आंदोलन मागे घेतलं. ते म्हणाले की 30 दिवसात इथला कचरा नाही हटला तर 31 व्या दिवशी हा सगळा कचरा आम्ही थेट महापालिकेत नेऊन टाकू.

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० …

रॅम्पच्या कामाला वेग

आंदोलन झाल्यावर उपमहापौर मनोज चौधरी यांनी लगेच एक बैठक घेतली. TB सेंटर इथल्या रॅम्पच्या कामाचा आढावा घेतला. एका महिन्यात रॅम्पचं काम पूर्ण करून कचरा डेपो कायमचा तिथे शिफ्ट करायचा असं ठरलं आहे.चौधरी यांनी शहर अभियंता योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता योगेश वाणी आणि PMC च्या अधिकाऱ्यांना उद्यापासूनच कामाला वेग द्यायच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला नगरसेवक अमर जैन पण हजर होते.आता एका महिन्यात खरंच हा कचरा डेपो हटतो का, हे बघणं महत्वाचं आहे.

Web Title: Jalgaon iti garbage depot abvp student protest municipal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
1

Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…
2

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
3

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?
4

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.