Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Maharashtra News: पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 03:47 PM
Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांच्या नुकसानीवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश.
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मदतीचे नियोजन.
  • पाणीटंचाई, शाळा आणि MRI सेवेसह विविध प्रश्नांचा बैठकीत आढावा.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान, पाणीटंचाई, जीर्ण शाळांच्या वर्गखोल्या आणि जिल्हा रुग्णालयातील एमआरआय सेवेसह विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिलासा देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. Maharashtra News:

जिल्हा नियोजन समितीची बैठक १७ सप्टेंबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यावेळी उपस्थित होते.

पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, पाण्याचे दुर्भिक्ष्यही निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची माहिती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जीर्ण शाळांसाठी निधी

जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी अशा वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

एमआरआय सेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश

जिल्हा रुग्णालयातील एमआरआय तपासणीसाठी रुग्णांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. एमआरआय सेवा देणाऱ्या एजन्सीची बैठक घेऊन प्रलंबित देयकांबाबत कार्यवाही करावी. गंभीर रुग्ण एमआरआय तपासणीपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश

जिल्हा नियोजन समितीकडून विविध यंत्रणांना वितरित होणारा निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच कामांची गुणवत्ता राखण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी २०२६-२७ मध्ये मंजूर कामांना सप्टेंबरअखेर प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. संबंधित यंत्रणांनी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

५७०.५३ कोटींच्या नियतव्ययापैकी १२.५७ कोटी खर्च

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना या तीनही योजनांसाठी एकूण ५७० कोटी ५३ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. १५ सप्टेंबरअखेर ७० कोटी ५८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता, १६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, १२ कोटी ५७ लाख रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला आहे. खर्चाचे प्रमाण २.२० टक्के आहे.

सर्वसाधारण योजनेसाठी ४९४ कोटी रुपयांचा नियतव्यय असून, ६६ कोटी २३ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. १३ कोटी १ लाख रुपये वितरित झाले असून, ८ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. खर्चाचे प्रमाण १.७५ टक्के आहे. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी ७४ कोटी रुपयांचा नियतव्यय असून, ३ कोटी २१ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता व तेवढाच निधी वितरित झाला आहे. हा संपूर्ण निधी खर्च झाला असून, खर्चाचे प्रमाण ४.३४ टक्के आहे.

आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी २ कोटी ५३ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी १ कोटी १४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ६९ लाख ३८ हजार रुपये वितरित झाले आहेत. वितरित संपूर्ण निधी खर्च झाला असून, खर्चाचे प्रमाण २७.४२ टक्के आहे.

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

बैठकीत १ मे २०२६ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास आणि त्यावरील कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. १५ सप्टेंबरअखेर जिल्हा वार्षिक योजनेतील खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी योजनेच्या खर्चाची माहिती दिली. विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Web Title: Kharif crop damage farmer relief pratap sarnaik urgent action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • maharashtra news
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…
1

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
2

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
3

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
4

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.