Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीची घरफोडी करणाऱ्या आरोपीला ३६ तासात अटक, १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रघुनाथ सखाराम शेलार हे घणसोलीतील रहिवासी असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी खांदा कॉलनी येथे गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराची कडी तोडून कपाटातील दागिणे व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 15, 2024 | 04:00 PM
रात्रीची घरफोडी करणाऱ्या आरोपीला ३६ तासात अटक, १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : घणसोलीत घरपोडी करून २ लाख ३७ हजारांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार रबाळे पोलिसात दाखल झाली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास व गुप्त बातमीच्या आधारावर अंकुश उत्तम ढगे यास घनसोलीमधून अटक करून एकूण बारा गुन्ह्यांची उकल करून तब्बल १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

रघुनाथ सखाराम शेलार हे घणसोलीतील रहिवासी असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी खांदा कॉलनी येथे गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराची कडी तोडून कपाटातील दागिणे व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तक्रार त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याबाबत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे व गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी दीपक खरात व पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास तसेच बातमी दाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारावर अंकुश उत्तम ढगे वय ३९ वर्ष, राहणार घनसोली गाव, याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्यावर एकूण १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची उकल काढण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अंकुश ढगे हा सराईत गुन्हेगार असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अंकुश ढगे याच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात ११, रबाळे, आझाद मैदान, कोनगाव व एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा रात्रीच्या घरफोड्या करून सोने-चांदी चोरून मिळालेल्या रकमेतून उदरनिर्वाह व मौजमजा करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: The accused who burglarized the house at night was arrested within 36 hours valuables worth 12 lakh 35 thousand were seized navi mumbai crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • rabale
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Navin Chichkar : हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळमार्गे परदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक
1

Navin Chichkar : हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळमार्गे परदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार
2

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
3

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
4

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.