Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार? सरकारकडून निधी मंजूर

अंदाजपत्रकात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी १९० कोटी ९२ लाख १८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2025 | 05:25 PM
शाळेच्या पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार? सरकारकडून निधी मंजूर

शाळेच्या पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार? सरकारकडून निधी मंजूर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात (सन २०२५-२६) मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. या अंदाजपत्रकात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी १९० कोटी ९२ लाख १८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर केली आहे.

याशिवाय राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेवरील कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी ६६ कोटी ९४ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील ४२ लाख ९७ हजार ७९० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येत असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.

या शाळांना योजना लागू

योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी दोन गणवेश दिले जाणार असून, यासाठी प्रति विद्यार्थी ६०० रुपायांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार या गणवेशासाठी १९० कोटी ९२ लाख १८ हजार रुपायांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही मोफत गणवेश योजना सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील मुले, अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले आदींसाठी लागू करण्यात आलेली आहे.

मोफत गणवेश योजना ही निश्चितच फलदायी आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर गणवेशाची रक्कम जमा व्हावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हे प्रत्येकी दोन मोफत गणवेश वाटप करणे शक्य होईल. परिणामी शाळेत आलेल्या सर्व मुलांच्या आनंदात भर पडेल. – दत्तात्रेय जानकु वाळुंज, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

Web Title: The central government has approved funds for free uniforms for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • goverment news
  • PM Narendra Modi
  • School
  • School Students

संबंधित बातम्या

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
1

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
4

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.