Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! केडीएमसीच्या १८ शाळांची दुरावस्था

कल्याणमधील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करीत आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2025 | 04:28 PM
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! केडीएमसीच्या १८ शाळांची दुरावस्था

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! केडीएमसीच्या १८ शाळांची दुरावस्था

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १८ शाळांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करीत आहे. दुरावस्था झालेल्या १८ शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हीजीट करावी अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज (3 जुलै) केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. त्यांना दुरावस्था झालेल्या १८ शाळांची यादीच आयुक्तांकडे सूपूर्द केली आहे. आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले.

कोल्हापुरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, शिक्षणक्षेत्रात खळबळ

याप्रकरणी माजी नगरसेवक शिंदे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी चांगले उपक्रम सुरु केले आहे. त्यात महापालिका आयुक्तांनी शैक्षणिक उपक्रमाला उपस्थीती लावून प्रोत्साहन दिले आहे. तसेच काही शाळांची रंगरंगोटी करून शालेय साहित्य पुरविले आहे. त्याठीकाणी भेटही दिली आहे, मात्र महापालिका हद्दीतील १८ शाळांची दुरावस्था झाली आहे. या शाळेत अस्वच्छता असून पाण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रसाधानगृहांची दुरावस्था झाली आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. या शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हीजीट दिली तर खरी परिस्थिती उघड होईल. मोहिली येथील महापालिकेची शाळा फेब्रुवारी महिन्यात बांधण्यास सुरुवात केली आहे. या शाळेचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. ते काम पूर्ण होण्यास आधीच सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होणार आहे. त्याचे काय ? असा सवाल शिंदे यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या अग्नीशमन दलात १२० तरुण हे २०१९ पासून काम करीत आहे. अग्नीशमन दलात काम करणे हे जोखमीचे काम आहे. त्या तरुणांना १७ ते १८ हजार रुपये पगार देऊन राबवून घेतले जात आहे. त्यांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३० हजार रुपये किमान वेतन द्यावे. महापलिकेची रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्याठीकाणी रिक्त असलेल्या पदांवर या तरुणांना महापालिकेच्या कायम स्वरुपी सेवेत समावून घ्यावे अशी मागणीही शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Bhayander News : दुकानदाराला मारहाण घटनेनंतर व्यापाऱ्यांचा संताप; पोलीस उपायुक्तांनी घेतली आंदोलनाची दखल

Web Title: The condition of 18 schools in the kalyan dombivli municipal corporation has deteriorated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • School

संबंधित बातम्या

Kalyan : मराठा आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा, पण सभ्य पद्धतीची मागणी
1

Kalyan : मराठा आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा, पण सभ्य पद्धतीची मागणी

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार, हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
2

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार, हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म, काय आहे नेमकं प्रकरण?
3

नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म, काय आहे नेमकं प्रकरण?

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश
4

Kalyan Police : कल्याण पोलिसांचा फिल्मी स्टाईल सर्च ऑपेरेशन, विशाखापट्टनमच्या जंगलातून आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.