Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक बोट सज्ज! माझगाव डॉकचा पहिला प्रयोग; परवडणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग खुला होणार

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने पहिल्यांदाच देशातील १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. यामध्ये ६० टक्के परदेशी आणि ४० टक्के भारतीय उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 03:30 PM
देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक बोट सज्ज! माझगाव डॉकचा पहिला प्रयोग

देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक बोट सज्ज! माझगाव डॉकचा पहिला प्रयोग

Follow Us
Follow Us:

संरक्षण क्षेत्रातील आघाडीची संस्था माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. भारतीय समुद्राच्या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करून बनवलेल्या या बोटीच्या चाचण्या सुरू असून, पावसाळ्यात तिची खरी कसोटी लागणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सर्वसामान्यांना परवडणारी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक उपलब्ध होणार आहे.यापूर्वी विकसित करण्यात आलेल्या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या मॉडेलमध्ये सुमारे ६० टक्के परदेशी आणि ४० टक्के भारतीय उपकरणांचा वापर करण्यात आला होता. मात्र भारतीय किनारपट्टीवरील समुद्री परिस्थितीत अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्या अनुभवाच्या आधारे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

एमडीएलचा हा प्रयोग देशातील जलवाहतुकीत नवे पर्व सुरू करणारा ठरू शकतो. तसेच भविष्यात सर्वसामान्यांसाठी परवडणारी जलवाहतूक व्यवस्था विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. एमडीएलने सुरुवातीला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणासाठी विकसित केलेल्या दोन इलेट्रिक वॉटर टॅक्सीमध्ये परदेशी तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला होता. भारतीय समुद्रातील उंच लाटा, बदलते हवामान आणि चार्जिंग सुविधांच्या मर्यादा लक्षात घेता बॅटरी व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण संचालनात काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अनुभवाच्या आधारे एमडीएलने नव्या पिढीची इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. यात देशांतर्गत उत्पादित यंत्रसामग्री आणि प्रणालींचा वापर करण्यात आला असून त्यामुळे देखभाल खर्च कमी होण्याबरोबरच भविष्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणेही सुलभ होणार आहे. जलवाहतूक ही केवळ पर्यायी व्यवस्था न राहता दैनंदिन प्रवासाचे प्रभावी साधन व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या या टॅक्सींच्या चाचण्या सुरु असून पावसाळ्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. उंच लाटा, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वेग, स्थिरता, बैटरी क्षमता, ऊर्जा वापर आणि सुरक्षिततेची तपासणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्यानंतरच व्यावसायिक वापराचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहेत ठळक वैशिष्ट्ये:

  • पहिल्या मॉडेलमध्ये ६०% विदेशी, ४०% भारतीय उपकरणे
  • नव्या मॉडेलमध्ये १००% स्वदेशी तंत्रज्ञान
  • चार्जिंग व्यवस्थेतील त्रुटींवर मात
  • पावसाळ्यात कठोर समुद्री चाचण्या
  • यशस्वी चाचण्यांनंतर जेएनपीटीला दोन बोटी
  • सर्वसामान्यांसाठी किफायतशीर मॉडेलवर भर
Mumbai News: कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

जेएनपीटीला दोन बोटी

एमडीएलने विकसित केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी पुढील टप्प्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला सुपूर्द करण्यात येणार आहेत. सुरुवातीला त्यांचा वापर कर्मचा-यांच्या वाहतुकीसाठी केला जाणार असून, या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे इतर जलमार्गावरही अशा सेवांचा विस्तार करण्याची योजना आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The countrys first 100 percent indigenous electric boat is ready a pioneering initiative by mazagon dock paving the way for affordable water transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
4

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.