Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Mumbai News: वायुप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या उद्दिष्टाला परिषदेने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 08:55 AM
प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप 'वास्तुकला परिषदे'चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप 'वास्तुकला परिषदे'चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण उपायांची अमलबजावणी करण्याचे बंधनकारक हमीपत्र वास्तुविशारदांकडून घेण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला ‘वास्तुकला परिषदे’ ने (काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर) जोरदार आक्षेप घेतला आहे. बांधकाम किंवा पाडकामाच्या जागेवर प्रत्यक्ष उपाययोजना राबवणे ही जागामालक, विकासक आणि कंत्राटदाराची जबाबदारी असून त्याचा भार वास्तुविशारदांवर टाकता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत पालिकेने या परिपत्रकात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी परिषदेने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने २ सप्टेंबर २०२६ रोजी एक परिपत्रक जारी केले होते. बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी धूळ व वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या नियमांची पूर्तता करण्याबाबत वास्तुविशारदांकडून हमीपत्र घेणे या परिपत्रकाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे. यावर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त वैधानिक संस्था असलेल्या ‘वास्तुकला परिषदे’चे निबंधक दीपक कुमार यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून परिषदेची भूमिका मांडली आहे.

वास्तुविद् कायद्याचा दाखला, माहिती देण्याची मागणी

‘वास्तुविद् कायदा, १९७२’ आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘व्यावसायिक आचारसंहिता नियमावली, १९८९’ चा दाखला देत परिषदेने म्हटले आहे की, नोंदणीकृत वास्तुविशारद केवळ त्यांच्या व्यावसायिक कक्षेत येणाऱ्या कर्तव्यांसाठीच उत्तरदायी असतात. पालिकेच्या या अटीमुळे वास्तुविशारदांवर त्यांच्या वैधानिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांच्या पलीकडचे दायित्व लादले जात असून, ते केंद्रीय कायद्याच्या चौकटीला बाधा पोहोचवणारे आहे. त्यामुळे महापालिकेने २ सप्टेंबरच्या परिपत्रकात योग्य ते स्पष्टीकरण देऊन त्यात दुरुस्ती करावी, प्रत्यक्ष बांधकाम व्यवस्थापनाशी संबंधित घटकांवरच जबाबदारी निश्चित करावी आणि या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती परिषदेला द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

वायुप्रदूषण रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

वायुप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या उद्दिष्टाला परिषदेने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, बांधकामाच्या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू करणे, पाडकाम करणे तसेच प्रदूषण नियंत्रण उपायांची दैनंदिन अंमलबजावणी करणे ही सर्वस्वी जबाबदारी जागामालक, विकासक, प्रत्यक्ष बांधकाम कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची असते. वास्तुविशारद केवळ आराखड्यापुरते मर्यादित असतात; प्रत्यक्ष जागेवरील दैनंदिन कामावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे तिथे घडणाऱ्या प्रत्येक कृती, त्रुटी किंवा नियमांच्या उल्लंघनाची कायदेशीर व व्यावसायिक जबाबदारी वास्तुविशारदांवर लादणे अयोग्य आहे, असा युक्त्तिवाद परिषदेने केला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news council of architecture challenges bmcs decision to assign pollution control duties to architects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • BMC
  • environment
  • Mumbai News

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
1

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
2

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
3

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
4

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.