Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Chhagan Bhujbal : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालय कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने 24 सप्टेंबर 2026 रोजी भुजबळांसह इतर आरोपींना दोषमुक्त केलं.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 05:26 PM
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Follow Us
Follow Us:
  • कलिना ग्रंथालय कंत्राट प्रकरणात छगन भुजबळांसह इतर आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा.
  • ACBने खासगी विकासकाला भूखंड कमी दराने दिल्याचा आणि कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप केला होता.
  • या निर्णयामुळे भुजबळांविरोधातील ACBकडील प्रलंबित भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
 

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मुंबईतील बहुचर्चित कलिना ग्रंथालय प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कंत्राट आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात विशेष न्यायालयाने गुरुवारी, 24 सप्टेंबर 2026 रोजी भुजबळांना दोषमुक्त केलं. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयाने दोषमुक्त केल्याचं समोर आलं आहे.

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना कलिना परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या भूखंडाच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता. खासगी विकासकाला भूखंड अत्यंत कमी दराने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आला आणि या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ACBकडून करण्यात आला होता. ACBने या प्रकरणात भुजबळांसह तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला होता.

नेमकं काय होतं कलिना ग्रंथालय प्रकरण?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भूखंडावर मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्याची योजना होती. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटाची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, भूखंडाच्या एका भागावर ग्रंथालय उभारल्यानंतर उर्वरित जमीन खासगी विकासकाला 99 वर्षांसाठी अत्यंत कमी दराने देण्यात आल्याचा ACBचा आरोप होता. काही रिपोर्ट्सनुसार हा दर एक रुपया प्रति चौरस मीटर इतका असल्याचं तपास यंत्रणेने म्हटलं होतं.

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

या प्रकरणात भुजबळांशी संबंधित ट्रस्टला खासगी कंपनीकडून पैसे मिळाल्याचाही आरोप करण्यात आला होता. तपास यंत्रणेने या व्यवहारांचा कथित कंत्राट प्रक्रियेशी संबंध असल्याचा दावा केला होता. मात्र, भुजबळ आणि इतर आरोपींनी हे आरोप नाकारले होते.

न्यायालयाच्या निर्णयाने भुजबळांना मोठा दिलासा

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने छगन भुजबळ आणि इतर आरोपींना दोषमुक्त केलं आहे. न्यायालयाचा सविस्तर आदेश अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने दोषमुक्तीमागची नेमकी कारणं सध्या स्पष्ट झालेली नाहीत.

दरम्यान, या निर्णयामुळे भुजबळांना आणखी एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाच्या काळाशी संबंधित ACBच्या प्रलंबित भ्रष्टाचार प्रकरणांमध्येही आता त्यांना दिलासा मिळाला आहे.

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Web Title: Chhagan bhujbal kalina library case acquitted mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Mumbai News
  • Mumbai University

संबंधित बातम्या

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
1

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
2

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
3

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
4

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.