
मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
मुंबईच्या क्रूझ प्रवासातील टप्पे
‘कॉरडेलिया स्काय’ची लांबी २५८ मीटर असून, त्याचे वजन ७७ हजार १०४ ग्रॉस टन आहे. दोन प्रवाशांच्या ऑक्युपन्सीवर जहाजाची क्षमता दोन हजार चार प्रवाशांची आहे.
जहाजावर एक हजार दोन स्टेटरूम्स आहेत. प्रवाशांसाठी १० डायनिंग व्हेन्यूज, ११ बार आणि लाउज, दोन जलतरण तलाव आणि पाच हॉट टब आहेत.
वीकेंडपासून लक्षद्वीपपर्यंत
मुंबईहून ‘कॉरडेलिया स्काय’च्या माध्यमातून दोन रात्रीची वीकेंड क्रूझ, तीन रात्रीची गोवा कुझ आणि चार रात्रीची लक्षद्वीप क्रूझ करता येणार आहे. गोवा आणि लक्षद्वीप या दोन्ही ठिकाणाचा समावेश असलेली पाच रात्रीची क्रूझही प्रस्तावित आहे.
पुढचा टप्पा आग्नेय आशिया
चेन्नईहून सात रात्रीच्या आग्नेय आशिया क्रूझाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रवासात फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूरचा समावेश असेल. त्यामुळे देशांतर्गत प्रवासासोबत आंतरराष्ट्रीय समुद्री सफरीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध
मनोरंजन, गेमिंगचीही व्यवस्था
जहाजावर पिकलबॉल, सी क्रिकेट, जलतरण, गेमिंग आणि फिटनेसच्या सुविधा आहेत. लाइव्ह संगीत, विविध शो आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय प्रादेशिक खाद्यपदार्थासह सुशी आणि इटालियन खाद्यपदार्थांचे पर्यायही उपलब्ध असतील.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)