Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकास कामांबाबत हयगय खपवून घेणार नाही ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा अधिकाऱ्यांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सुचविलेल्या विकासकामांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार गतिमान आहे हे लोकांना आपल्या कामातून दिसले पाहिजे, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

  • By Aparna
Updated On: Oct 30, 2022 | 06:23 PM
shambhuraje desai

shambhuraje desai

Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सुचविलेल्या विकासकामांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार गतिमान आहे हे लोकांना आपल्या कामातून दिसले पाहिजे, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

हिरडा नाका येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते,  प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,  तहसिलदार सुषमा चौधरी पाटील,  मुख्याधिकारी पल्लवी पाटील,  पाचगणी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व सातारचे अभिजित बापट, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावणे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी, अजय देशपांडे, शिवप्रसाद धुमाळ, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, सुनील पार्टे,  गट शिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रद्युमन बुलाख, आगर व्यवस्थापक नामदेव पतंगे आदी अधिकारी उपस्थित होते.

-महाबळेश्वर तालुक्याच्या विकासकामाबाबत चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असल्याने त्यांनी महाबळेश्वर तालुक्यासाठी  जवळजवळ अकराशे  कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.  या निधीतून कोणती विकासकामे कारायची याची सूचना करून संबंधित विभागांकडून याबाबतचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार  विविध विभागांनी सादर केलेल्या  प्रस्तावांचा आढावा  पालकमंत्री  देसाई यांनी   बैठकीत घेतला.

-तहसील कार्यालयासाठी जागा ताब्यात घ्या
यावेळी तहसिद्लार सुषमा चौधरी पाटील यांनी तहसील कार्यालयासाठी नियोजित जागा दुग्धविकास विभागाची असल्याने त्या हस्तांतरणासाठी अडचणी येत असल्याने ना.  देसाई यांना सांगितले.  यावर ना.  देसाई यांनी  ही मिळकत जर शासकीय असेल तर परवानगीची कोणतीही गरज नसून तातडीने ही जागा ताब्यात घेऊन एक महिन्याच्या आत याचा विकास आराखडा सादर करावा.  पाटण येथील कार्यालयाप्रमाणे एकाच ठिकाणी सर्वच विभागाची येथे कार्यालय करता येतील असे त्यांनी सुचविले.

–  व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार
महाबळेशवरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, आपण सादर केलेले  २१५ कोटी रुपयांचे प्रस्ताव उपसचिव कार्यालयापर्यंत पोहचले असून लवकरच उपसचिवांकडून प्रस्तावास मंजुरी मिळेल.  त्यावर ना.  देसाई म्हणाले, दिवाळी हंगामामुळे गर्दी असून हंगाम संपताच बाजारपेठेतील कामे सुरु करता येतील.  ही कामे २४x७ कामे सुरु ठेऊन दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष द्या असे सांगितले.  तसेच आपण स्वतः बाजारपेठेची पाहणी करून व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेऊ असे देखील नमूद केले.

-गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी
महाबळेश्वर येथील या आढावा बैठकीत तीन ते चार विभागांचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते.  या अधिकाऱ्यांसंदर्भात जिलाधिकाऱ्यांशी बोलताना ना. देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘हे असे चालणार नाही.  सुट्टीचा दिवस असून इतर विभागांचे अधिकारी हजर आहेत मात्र तीन चार विभागांचे अधिकारी सुटीचे  कारण देऊन गैरहजर राहतात, याचे कारण काय ?’, असा सवाल उपस्थित केला.  पुढील बैठकीत अशी कोणतीही करणे चालणार नाही असा सज्जड इशाराही ना. देसाई यांनी  दिला.

Web Title: The developers will not tolerate home guardian minister shambhuraj desai warned the authorities nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 04:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sambhuraje desai
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
4

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.