Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guardian Minister of Raigad: रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणार? अमित शाहांच्या रायगड दौरा अन् अजित पवारांचे सूचक विधान

गृहमंत्री अमित शाह आज (11 एप्रिल)  रात्री पुण्यात मुक्कामासाठी थांबतील. त्यानंतर शनिवारी सकाळी ते रायगड किल्ल्याकडे रवाना होतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 11, 2025 | 10:56 AM
Guardian Minister of Raigad: रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणार? अमित शाहांच्या रायगड दौरा अन् अजित पवारांचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: केंद्रीय  गृहमंत्री अमित शाह उद्यापासून ( 12 एप्रिल)  दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत.  या दौऱ्यात ते रायगडालाही भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी जाऊन स्नेहभोजनास उपस्थित राहणार असल्याचही माहिती समोर आली आहे. अमित शाहांच्या या दौऱ्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.  राज्यातील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी  रायगड जिल्हया पालकमंत्री अद्यापही नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे अमित शाह यांचा तटकरे यांच्या घरी होणारा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.  तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांच्यात नाराजीची चर्चा रंगली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या सन्मानार्थ खासदार सुनील तटकरे यांच्या निवास्थानी आयोजित स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल  हेदेखील उपस्थित राहणार आहेत.  मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले हे या कार्यक्रमात सहभागी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

UP News: बलात्काराला तुम्ही स्वतःच जबाबदार! पीडितेला फटकारत अलाहाबाद न्यायालयाचा आरोपीला जामीन

मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह आज (11 एप्रिल)  रात्री पुण्यात मुक्कामासाठी थांबतील. त्यानंतर शनिवारी सकाळी ते रायगड किल्ल्याकडे रवाना होतील. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावात ते राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतील.  त्यानंतर रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.  यानंतर ते  खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी  उपस्थित राहतील. त्यानंतर अमित शाह मुंबईकडे रवाना होतील.  मुंबईत दाखल झाल्यानंतर ते एका कार्यक्रमात उपस्थित राहतील.  त्या कार्यक्रमानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत.

अजित पवारांचेही सूचक विधान

अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावर भाष्य केलं आहे.  “काळजी करू नका, थोडा धीर घरा,  नाशिक आणि  रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, त्यावर प्रक्रिया सुरू आहे.” असं अजित पवार यांनी  म्हटलं आहे.

घोर निराशा! व्हिसा न मिळाल्याने अमेरिकेतील स्पर्धेस खेळाडू मुकले, पदकेही हुकली; जीवनज्योत सिंग तेजा यांनी व्यक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा नियोजनाचे बजेट मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. निधीही वितरित करण्यात आले असून, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण २२ हजार कोटी रुपयांची तरतूद विविध भागांसाठी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The dispute over the post of guardian minister of raigad will be resolved amit shahs raigad visit and ajit pawars indicative statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah

संबंधित बातम्या

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
1

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
2

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
3

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.