नाशिक : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे (Chinchwad Constituency) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक (Bypoll) होत आहे. या पोटनिवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर (VBA Leader Prakash Ambedkar) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ‘वंचित’ची (VBA) भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे’.
…तर आमचं समर्थन असेल
आमची शिवसेनेची युती आहे. त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या, अशी आम्ही शिवसेनेला विनंती केली होती. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचं समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे
लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही. एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असेही त्यांनी सांगितले.