Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेत निवडणुकीच्या कामाला आला वेग; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि महापालिकेच्या या निवडणुकीसाठी कामाला वेग आलाय. १५ जानेवारी रोजी निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून सध्या ठाण्यात पूर्वतयारीची आढाव घेण्यात आलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 17, 2025 | 05:09 PM
ठाण्यात निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरूवात (फोटो सौजन्य - iStock)

ठाण्यात निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरूवात (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज
  • निवडणुकीची पूर्वतयारी जोरात 
  • कामाला प्रचंड वेग 
ठाणेः चालू वर्षात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सजा झाले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी महापालिका निवडणूकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीस निवडणूकविभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडके, मिताली संचेती, सचिन सांगळे, दिपक झिंजाड, अनघा कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्व तयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र निश्चिती व तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती व तयारी, वाहन उपलब्धतता व सनियंत्रण, सी.सी.टिव्ही व वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्था, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रे, सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आदी ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा तसेच अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच अति संवेदनशील भागातील निवडणूक निणर्य अधिकारी यांची कार्य रूये इट बदी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

Thane Ghodbunder Road: ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडी, घोडबंदर रोडवर शुक्रवारपासून वाहतूकीत बदल, असे असतील पर्यायी मार्ग

ठाणे शहरात १९४२ मतदान केंद्र

  • ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ३३ प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६७ इतकी आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ८ लाख ६३ हजार ८७८ इतकी तर महिला मतदारांची संख्या ७ लाख ८५ हजार ८३० इतकी असून इतर मतदारांची संख्या १५९ इतकी आहे
  • ३३ प्रभागात एकूण १९४२ इतकी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. तर प्रत्यक्ष निवडणूकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मिळून एकूण ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत
  • यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २. मतदान अधिकारी ३, शिपाई व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. ठाणे शहरात १९४२ मतदान केंद्रासाठी ९ हजार ७१० कर्मचारी वर्ग आवश्यक असून या व्यतिरिक्त २० टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.
सर्वसामान्यांचा केला जाणार विचार

मतदान केंद्रावर मतदानासाठी येणान्या नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मतदान केंद्र ही तळमजल्यावर तयार करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी कीलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून निवडणूकीसाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांना नेमून दिलेल्या कामाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडावी. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपल्या कर्तव्यात कसूर न करता निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पाडावी असे नमूद करीत अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

Mumbai-Nashik Highway: प्रवाशांनो लक्ष द्या! ठाण्यातील ‘या’ मार्गांवरील वाहतूक चार महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Web Title: The election work has gained momentum in the municipal corporation a review of the election preparations was conducted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Local Body Election
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!
4

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.