Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका; होर्डिंग्जसाठीच्या जाहिरात दराविरोधातील याचिका फेटाळली

जाहीरातदारांची दराच्या विराेधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे महापालिका आता प्रति चाैरस फुट २२२ रुपये इतका दर जाहीरातदारांकडून वसुल करु शकते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 12:10 PM
अपघात प्रकरणातील पीडित कुटुंबाला लोकअदालतचा दिलासा; तब्बल एक कोटीची नुकसानभरपाई

अपघात प्रकरणातील पीडित कुटुंबाला लोकअदालतचा दिलासा; तब्बल एक कोटीची नुकसानभरपाई

Follow Us
Close
Follow Us:
  • जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका
  • होर्डिंग्जसाठीच्या दराविरोधातील याचिका फेटाळली
  • चारशे काेटीपेक्षा अधिक थकबाकी मिळण्याची शक्यता
पुणे : जाहीरातदारांची दराच्या विराेधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे महापालिका आता प्रति चाैरस फुट २२२ रुपये इतका दर जाहीरातदारांकडून वसुल करु शकते. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात थकीत चारशे काेटी रुपयांसह अधिक भर पडू शकणार आहे. महापालिकेने जाहीरातदारांकडून उभारण्यात आलेल्या जाहीरात फलकांसाठी (हाेर्डींग ) प्रति चाैरस फुटाप्रमाणे दर निश्चित केले हाेते. या निर्णयाला जाहीरातदारांनी विराेध करीत ही दरवाढ अधिक असल्याचा दावा करीत उच्च न्यायालयात दाद मागितली हाेती.

गेल्या आठ वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित राहीले हाेते. महापालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. निशा चव्हाण यांनी सातत्याने या याचिकेचा पाठपुरावा केला. महापालिकेने उच्च न्यायालयात मांडलेली भुमिका उच्च न्यायालयाने ग्राह्य मानली. जाहीरातदारांची याचिका अमान्य केली असून, यासंदर्भात अधिक तपशील हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत हातात आल्यानंतरच सांगता येईल असेही अॅड. चव्हाण यांनी नमूद केले.

चारशे काेटी रुपयांहून अधिक थकबाकी मिळू शकते

महापालिकेच्या विराेधात जाहीरातदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याने त्यांच्याकडून वाढीव शुल्क भरले जात नव्हते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता प्रति चाैरस फुट २२२ रुपये इतक्या दराने आकारणी केली जाऊ शकते. यामुळे महापालिकेला थकीत आकाश चिन्ह परवाना शुल्काचे थकीत चारशे काेटी रुपयाहून अधिक महसुल मिळू शकताे.

आता २२२ रुपयांनी आकारणी

महापालिकेने २०२२ साली जाहीरात शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला हाेता. राज्य सरकारने हा प्रस्ताव विखंडीत केल्याने जुन्या दराप्रमाणे म्हणजेच १११ रुपये दराने शुल्क वसुली करावी लागत आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २२२ रुपये दरानेच आकारणी केली जाऊ शकते.

नवीन वाढीव शुल्क आणि दंडाच्या रक्कमेचा प्रस्ताव

महापालिकेने २०२२ साली वाढीव शुल्काचा प्रस्ताव पाठविला हाेता. आता पुन्हा एकदा नवीन शुल्क दर निश्चित केला जाऊ शकताे. तसेच अनधिकृत हाेर्डींगवर आकारला जाणारा दंडही वाढविण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनाकडून तयार केला जाऊ शकताे.

Web Title: The high court has dismissed the petition of advertisers against the rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता
1

Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता

Pune LPG Shortage: पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम
2

Pune LPG Shortage: पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम

Animal Health : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता
3

Animal Health : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
4

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.