Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गप्रेमींनो डोळस व्हा! सर्वांचं खास आकर्षण असणारं कास होतंय भकास, पर्यावरण वाचवण्याची गरज

साताऱ्यातील कास हे पर्यावरणप्रेमी आणि निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्यांचं खास आकर्षण आहे. मात्र आता हेच कास भास होताना दिसून येत आहे. पर्यावरणप्रेमींसाठी आता हीच खरी वेळ जागरूक होण्याची आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 27, 2026 | 09:42 PM
कास पठाराचे झाले तरी काय

कास पठाराचे झाले तरी काय

Follow Us
Follow Us:
  • कास होतंय भकास 
  • पर्यावरण वाचविण्याची गरज 
  • निसर्गाचे अस्तित्व धोक्यात 
सातारा/श्रीरंग काटेकर: जल है तो कल है! याप्रमाणे वनसंपदा असेल तर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे.हे निसर्गाचे वास्तव सूत्र आहे.परंतु काही मंडळी स्वार्थासाठी व व्यवसायासाठी निसर्गावर घाला घालत आहेत.स्वार्थ साधणाऱ्या या मंडळीमुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.यामध्ये प्रामुख्याने धनिक मंडळी अग्रेसर असल्याचे दिसून येते.सातारचे वैभव असलेले कास पठार व कास परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे.

या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटक विशेषता विविध देशातील पर्यटक साताऱ्यातील कास पठार व परिसराला भेटी देत असतात.जागतिक पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी रिसॉर्ट ची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.असंख्य धनदांडग्यांनी या परिसरात जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहेत.या धनिकांनी आपले व्यवसाय उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत.

धनदांडग्यांनी लाटले कास 

स्थानिक भूमिपुत्रांच्या मुंड्या मुरगळून व दबाव तंत्राचा वापर करून धनदांडग्यांनी लाटलेल्या कास परिसरातील भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केले आहेत. भूमिपुत्रांच्या अज्ञान व अशिक्षितपणा चा लाभ उठून अल्प किमतीत घेतलेल्या जमिनी आता अनेक जण मुंबई पुण्यातील उद्योजकांना चढ्या भावाने विकत आहेत.भूमिपुत्रांच्या जमिनीवर धनिक आता मालामाल होत आहेत.तर अनेक धनिकांनी या ठिकाणी मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत. एकेकाळी जमिनीचे मालक म्हणून मिरवणारे आता त्याच जागेत कामगार म्हणून काम करताना दिसून येत आहेत.हे विदारक चित्र पाहता भूमिपुत्रांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले येथील निसर्ग सौंदर्य त्यांच्या डोळ्यादेखत व्यवसायासाठी नष्ट होताना त्यांच्या मनाला मोठ्या यातना होत आहेत.

Satara: “शिवरायांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचे प्रयत्न”; राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप

कासचे झाले तरी काय?

निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या कासचे भकासीकरण व्यवसायासाठी करण्याचा जणूकाही विडाच या धनिकांनी उचलला की काय अशी शंका आता सातारकरांच्या मनात येऊ लागली आहे.व्यवसायासाठी जमिनीचे सपाटीकरण करताना असंख्य दुर्मिळ वनसंपदा नष्ट होत आहे.त्याचप्रमाणे जैवविविधता ही पण नष्ट होत आहे. अर्थकारणाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही धनिक मंडळी निसर्गाशी एकप्रकारे प्रतारणा करीत आहेत.या धनिकांना ना कायद्याचा धाक ना यंत्रणेचा वचक हम करो सो कायदा याप्रमाणे रिसॉर्टची बांधकामे ते करीत आहेत.

साताऱ्यातील या परिसरातील असंख्य रिसॉर्ट हे बेकायदेशीर व अनधिकृतपणे उभे राहिलेले आहेत.बोकाळलेल्या व्यवसायामुळे परिसरातील शांततेला आता गालबोट लागत आहे.या परिसरातील निसर्ग सौंदर्य तर धोक्यात आलेच आहे.पण परिसरात वाढलेल्या रिसॉर्ट मधून बारबाला नाचविण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. सातारच्या सुसंस्कृत संस्कृतीला यामुळे आता धोका निर्माण झाला आहे.निसर्ग सौंदर्याच्या रक्षणाबरोबरच आता सातारच्या सुसंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी ही सातारकरांनी खरंतर संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे.

वाढती गुन्हेगारी

परिसरातील गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ, ड्रग्स व अंमली पदार्थांचा वाढता व्यापार पाहता भविष्यात सातारकरांना ही डोकेदुखी ठरणार आहे.काही दिवसापूर्वी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये बारबाला नाचविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.धनिकांच्या मनमानी कारभारामुळे कासचे पर्यटन क्षेत्र भविष्यात धोक्यात येण्याची शक्यता आहे.ड्रग्स माफिया, अनधिकृत व्यावसायिक यांची या परिसरात मिलीभगत होत असल्याने हा परिसर भविष्यात अशांततेचे केंद्र होऊ नये म्हणून सातारकरांनी उठा, संघटित व्हा सातारचे वैभव असलेले कास पठार व निसर्ग सौंदर्य जपुया हा निर्धार आपण वेळीच केला नाही, तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही हे तितकेच खरे. 

साताऱ्यात रंगणार १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; जेएनयूच्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

निसर्गाची वाताहातच होईल 

कास पठार व परिसराला धनिकांचा विळखा पडला आहे.भविष्यात यामुळे निसर्गाची वाताहत होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.असे निसर्गतज्ज्ञांचे मत आहे.परिसरातील दुर्मिळ वनऔषधी व वृक्ष हे व्यवसायासाठी नष्ट केले जात आहेत.अनेक प्रजाती व वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात परिसरात होणारी वृक्षतोड पाहता परिसरातील जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.धनिकांच्या विळख्यात सापडलेले कासचे निसर्ग सौंदर्य भविष्यात टिकणार की नाही, अशी शंका आता येऊ लागली आहे. 

 

Web Title: The kaas plateau is deteriorating urgent need to save the environment warning for everyone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi Batmya
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
4

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.