Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराेधकांकडे आमदार, माझ्याकडे जनता; माढ्याच्या उमेदवारीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मांडली भूमिका

आमच्या विरोधकाकडे खूप आमदार असतील पण मत देणारी जनताच आमच्या बाजुला असल्याने आम्ही निश्चिंत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2024 | 10:21 AM
विराेधकांकडे आमदार, माझ्याकडे जनता; माढ्याच्या उमेदवारीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मांडली भूमिका
Follow Us
Follow Us:

अकलूज : विचारपुर्वक आणी संयमाने आम्ही पावले उचलत आहोत. आम्हाला माहिती आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आमची भूमिका ऐकण्याची घाई झाली आहे. येत्या १४ तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. आमच्या विरोधकाकडे खूप आमदार असतील पण मत देणारी जनताच आमच्या बाजुला असल्याने आम्ही निश्चिंत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हटले आहे.

माढा मतदार संघात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकङे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीले होते. अनेकांची नावे रोज चर्चेत येत होती. शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराची दोनदा यादी प्रसिध्द केली. पण त्यात धैर्यशील मोहीते पाटील यांंचे नाव येत नव्हते. त्यामुळे माढा मतदार संघात संभ्रम वाढला होता. धैर्यशील मोहीते पाटील यांना पवार उमेदवारी देणार, धैर्यशील मोहीते पाटील अपक्ष उभारणार किंवा भाजपा त्यांची समजुत काढणार असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. अखेर धैर्यशील यांनी आपल्या भाजपातील पदाचा राजीनामा दिला आणी आपण शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने माढ्याच्या निवडणुकीला रंग भरला आहे.

रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

पक्ष प्रवेश करण्यापुर्वीच धैर्यशील माेहिते पाटील यांनी गावभेट दाैऱ्याच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढला आहे. १४ तारखेपासुन खऱ्या अर्थाने बॅटींग करणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाल्याने माढ्याच्या मैदानात आता खऱ्या अर्थाने चुरशीचा सामना पहावयस मिळेल. मोहीते पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभारलेल्या रामराजे नाईक निंबाळकरांना नुकतेच सागर बंगल्यानंतर देवगिरी बंगल्यावर तातडीने बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे रामराजेंच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

सर्व शक्यतांना पूर्णविराम

मोहिते पाटील भाजपच्याविरोधात जाणार नाहीत. भाजप त्यांची समजुत काढेल या सर्व शक्यतांना धैर्यशील मोहीते पाटील यांच्या पदाच्या राजीनाम्यामुळे पुर्णविराम मिळाला आहे. मोहीते पाटील यांनी मुंबई येथे शरद पवारांची भेट घेतल्यापासुन शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. या सर्व धामधुमीत भाजपचे आमदार रणजितसिंह मोहीते पाटील अलिप्त असल्याचे दिसून येते आहे. आपल्या भुमिकेविषयी बोलणे त्यांनी टाळले आहे.

Web Title: The mlas with the opposition the people with me the courageous mohite patil played the role nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 10:21 AM

Topics:  

  • BJP
  • Madha Lok Sabha
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
1

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.