Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा

गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आज वेगळ्या वळणावर उभी आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2025 | 02:28 PM
राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट
  • अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा
  • फुटीनंतर कार्यकर्त्यांची ससेहोलपट
कोल्हापूर/दीपक घाटगे : काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी प्रभावी शक्ती म्हणून उदयास आला होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने स्थापनेच्या पहिल्याच दशकात राज्याच्या सत्तेवर आपली छाप उमटवली. अनेक उद्योगपती, सहकारी क्षेत्रातील नेते, तसेच विविध समाजघटकातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र आले. मात्र, गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आज वेगळ्या वळणावर उभी आहे.

तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येही फूट

फुटीनंतर या पक्षाचे दोन गट पडले – एक शरद पवार यांच्याशी निष्ठा राखणारा आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट. या विभाजनाने केवळ नेत्यांमध्येच नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येही मोठी फूट पडली आहे. अनेक कार्यकर्ते कोणत्या गटात राहायचे, कोणाचा झेंडा घ्यायचा या द्वंद्वात सापडले आहेत. जिल्हास्तरावर तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. अनेक ठिकाणी दोन्ही गट एकाच शाखेच्या नावावर हक्क सांगत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी क्षेत्र, शिक्षण संस्था आणि नगरपालिका निवडणुका यामध्ये भक्कम पाय रोवला होता. पण फुटीनंतर यांच्या मध्येही सत्तांतर घडले. काही ठिकाणी अजित पवार गटाने आपले वर्चस्व निर्माण केले, तर काही ठिकाणी जुने शरद पवार गटाचे पदाधिकारी आपले स्थान टिकवून आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी या राजकीय अनिश्चिततेमुळे सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

तिन्ही आघाड्यांवर राष्ट्रवादी तणावाखाली

आताच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गट सत्ताधारी भाजपसोबतच्या युतीत राहून राजकीय लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहे, तर शरद पवार गट स्वतंत्र ओळख जपून लढण्याचा निर्धार व्यक्त करतो आहे. तथापि, दोन्ही गटांच्या अंतर्गत संघटनांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. प्रचाराची रणनीती, उमेदवारी निश्चिती आणि कार्यकर्त्यांचे मनोबल या तिन्ही आघाड्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आज तणावाखाली आहे.

शरद पवार यांच्या अनुभवावर पक्षाचा पाया

“राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तिच्या संघटनेत आणि तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांत होती. पण फुटीनंतर ही शक्ती दोन तुकड्यांत विभागली गेल्याने पक्षाची ओळख धुसर होत चालली आहे. दोन्ही गट वेगवेगळे उमेदवार उभे करत राहिले, तर मतविभाजन अटळ आहे आणि त्याचा थेट फायदा विरोधकांना मिळू शकतो.” शरद पवार यांच्या अनुभवावर आणि अजित पवार यांच्या प्रशासन कौशल्यावर पक्षाचा पाया टिकून आहे, पण तळागाळातील एकजूट हे मोठे आव्हान ठरले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे चित्र आहे.

फुटीनंतर कार्यकर्त्यांची ससेहोलपट

फुटीनंतर कार्यकर्त्यांची ससेहोलपट, निष्ठांचा बदलता खेळ आणि राजकीय अनिश्चितता यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या ताकदीने मैदानात उतरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाची जुनी परंपरा आणि पवार कुटुंबाचे नेतृत्व या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्यांना एकत्र आणू शकतील का, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकेकाळी राज्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या या पक्षासमोर आज अस्तित्व टिकवण्याचे संकट उभे राहिले आहे. फुटीनंतर निर्माण झालेल्या या राजकीय वादळातून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला सावरून पुन्हा उभारी घेऊ शकेल का, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The nationalist congress party is at a different juncture today due to internal differences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • kolhapur
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली
1

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
2

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
3

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
4

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.