
ठाण्यात मतदार वाढले (फोटो सौजन्य - iStock)
प्रारूप मतदार याद्यांवर २० नोव्हेंबरपर्यंत हरकारी सूचना येण्यासाठी मुदत देण्यात आली असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी ठाणे सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण सोडत काढण्याची आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला होता आरक्षण सोडतीनंतर आता ३३ प्रभागांची प्रारूप मतदार यादी निवडणूक विधाने गुरुवारी जाहीर करण्यातआहे.
महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ
२०१० मध्ये झालेला निधीत मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ८०८ ती आहे. याचाच अर्थ पुरूष मतदारांची संख्या ही १ लाख ९६ हजार ३७० ने वाढली आहे. तर महिला मतदारांची संख्या २०१७ मध्ये ५ लाख ८१ हजार ०८७ एवढी होती. आता ही संख्या ७ लाख ८५ हजार इतकी आहे. त्यानुसार आता महिला मतदारांची संख्या २ लाख २४ हजार ७४३ ने वाढली आहे.
प्रभाग क्रमांक ८ ठरला सर्वात मोठा मतदारसंघ
नव्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक ८ हा सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे. या प्रभागात ६६ हजार ८३५ मतदार आहेत, सर्वात कमी मतदारांचा प्रभाग क्रमांक १० उरला आहे. या मतदार संपात ४० हजार ८८८ मतदार आहेत. त्यामुळे या दोन प्रभागांसाठी सूचना आणि हरकती येण्याच्या शक्यता जास्त आहेत.
जुलै २०२५ मधील मतदारांची संख्या – पुरुष ८ लाख ६३ हजार ८७८, महिला ७ लाख ८५ हजार ८३०
अत्यंत महत्त्वाचे दिवस
हरकती, सूचना दाखल करण्याचा कालावधी – २७ नोव्हेंबरपर्यंत २०२५ पर्यंत
अंतिम याद्या प्रसिद करणे – ५ डिसेंबर, २०२५
मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करणे – ८ डिसेंबर
मतदार केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करणे – १२ डिसेंबर
२७ नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना दाखल करता येणार
२०११ पासून जनगणना झाली नसल्याने प्रारूप मतदार यादी तयार करताना २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ ला जी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय पॅनल आणि ३३ प्रभाग याप्रमाणेच आगामी पालिका निवडणूक घेण्यात येणार आहे. २०११ ची लोकसंख्या ही १८ लाख ४१ हजार ४८८ एवढी होती. लोकसंख्या जरी जुनी असली तरी मतदारांची संख्या ही जुलैची धरण्यात आली आहे. त्यानुसार, ठाण्यात ४ लाख २१ हजार २६१ मतदार वाढले आहेत. जुलै पर्यंत नोंदणी झालेले मतदार या निवडणुकीत मतदान करणार असल्याने त्याचा परिणाम हा प्रत्येक प्रभागात जाणवला आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभागात एक प्रभाग हा आता ४० हजार
ते सर्वांत मोठा ६६ हजारांचा झाला आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये बाळकुम, माजिवडा, हायलॅन्ड आदी महत्वाच्या भागांचा समावेश असून याठिकाणी शिंदे सेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. आता हाच प्रभाग प्रारूप मतदार यादीत सर्वांत मोठ्या मतदारांचा प्रभाग ठरला आहे. या ठिकाणी ६६ हजार ८३५ मतदार असून त्यात ३२ हजार ४५८ स्त्री आणि ३४ हजार ३७१ पुरुष मतदार नोंदणी झाली आहे. घोडबंदर भागातील प्रभाग क्रमांक १ मध्ये ६० हजार ६८ मतदारांची नौद झाली आहे. प्रभाग क्रमांक ३३ या मुंब्यातील भागात ५९ हजार ९६२ मतदारांची नोंद दिसत आहे. सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक १० मध्ये असून ४० हजार ८८८ मतदार आहेत. या प्रभागात साकेत, के व्हिला, वृंदावन आदी महत्वाच्या भागांचा समावेश आहे. याठिकाणी २० हजार १०८ स्त्री तर २० हजार ७७८ मतदार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १९ मध्ये ४० हजार ९५८ मतदार आहेत. २०१७ च्या निवडणुकीमध्ये १२ लाख २८ हजार ६०६ इतकी मतदारांची संख्या होती. आता मतदारांची ही संख्या तब्बल ४ लाख २१ हजार २६१ ने वाढली आहे. महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार मतदारांची आताची संख्या ही १६ लाख ४९ हजार ८६७ एवढी झाली आहे. यावर सूचना आणि हरकती आल्यानंतर त्यांचा समावेश केल्यावर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.