Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यावरून राजकारण तापले! ‘विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेवरुन…’; नगरसेवक विजय धट काय म्हणाले?

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजने अंतर्गत विशेष निधी आणला असून राज्य शासनाकडूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 06:42 PM
पाण्यावरून राजकारण तापले! ‘विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेवरुन…’; नगरसेवक विजय धट काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

पाणीपुरवठा योजनेवरून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल
नगरसेवक विजय धट यांचा आरोप
ही योजना पूर्णच झालेली नसताना आरोप करणे चुकीचे

म्हसवड: म्हसवड शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी आणला असून ही योजना यशस्वी करण्यासाठी त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही, अशा दर्जेदार पद्धतीने या योजनेचे काम व्हावे यासाठी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहेत. असे असताना विरोधकांकडून विनाकारण उपोषणाचे नाट्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा आणि प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप ही योजना पूर्णच झालेली नसताना कामाचा दर्जा चांगला नाही, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत म्हसवडचे नगरसेवक विजय धट यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

म्हसवड पाणीपुरवठा योजनेवरून प्रशासनाच्या विरोधात दोन दिवस उपोषण करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सर्व काम नियमानुसारच सुरू आहे. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधकांनी उपोषणाचे नाटक केल्याचा पुनरुच्चार सत्ताधारी गटाने केला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजने अंतर्गत विशेष निधी आणला असून राज्य शासनाकडूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पुढील काही दिवसांत म्हसवडकरांसह मंत्री गोरे यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे.

विरोधक प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करून योजनेत गैरव्यवहार झाल्याचा कांगावा करत आहेत. मात्र, या योजनेसाठी मंत्री गोरे यांनी अपार मेहनत घेतली आहे. पुढील ३० वर्षे या योजनेसाठी पुन्हा निधी मिळणार नाही, त्यामुळे काम अधिक दर्जेदार झाले पाहिजे, हेच आमचेही मत आहे आणि म्हणूनच आम्ही कामावर सतत लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे ती संबंधित ठेकेदाराकडून चालवली जाणार आहे; त्यानंतरच ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली की नाही हे स्पष्ट होईल.

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

या योजनेसाठी शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून त्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. योजना पूर्ण झाल्यावर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेला कल्पना देण्यात आली असून त्यांची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे विनाकारण प्रशासनाला बदनाम करून लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी थांबवावा, असे आवाहन सत्ताधारी गटाकडून करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा पूजा विरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, सविता मासाळ, विजय बनगर, अभिषेक विरकर आणि अकील काझी आदी उपस्थित होते.

Web Title: The opposition not mislead people regarding water supply scheme said mhaswad corporator vijay dhat jaykumar gore 1313844

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Jayakumar Gore
  • Mhaswad
  • water scheme

संबंधित बातम्या

Mhaswad Municipal Council: म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; १९ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
1

Mhaswad Municipal Council: म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; १९ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.